आपले घर जळते आहे – ‘अ‍ॅमेझॉन’ जंगलातील आगीची आपत्ती म्हणून ‘जी७’मध्ये चर्चा करण्याचे फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचे आवाहन

आपले घर जळते आहे – ‘अ‍ॅमेझॉन’ जंगलातील आगीची आपत्ती म्हणून ‘जी७’मध्ये चर्चा करण्याचे फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचे आवाहन

पॅरिस – ‘आपले घर जळते आहे. खरोखरच जळते आहे. आपल्या पृथ्वीची फुफ्फुसे म्हणून ओळखण्यात येणारी व पृथ्वीवर २० टक्के प्राणवायूची निर्मिती करणार्‍या अ‍ॅमेझॉनमधील पर्जन्य वनांमध्ये भीषण व प्रचंड आग भडकली आहे. ही एक आंतरराष्ट्रीय आपत्ती आहे. जी७ गटातील देशांनी येत्या दोन दिवसात या मुद्यावर प्राधान्याने चर्चा करावी’, अशा शब्दात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अ‍ॅमेझॉनमध्ये भडकलेल्या वणव्यांवर जागतिक पातळीवर चर्चा आवश्यक असल्याची मागणी केली. अ‍ॅमेझॉन क्षेत्राचा भाग असलेल्या ब्राझिलने मात्र मॅक्रॉन यांच्या या वक्तव्यावर टीका केली असून मॅक्रॉन राजकीय स्वार्थासाठी या मुद्याचे भांडवल करीत असल्याचा आरोप केला.

‘अ‍ॅमेझॉन’, आपत्ती, इमॅन्युएल मॅक्रॉन, जी७, वणवा, फ्रान्स, ब्राझिलब्राझिलमध्ये गेल्या महिन्याभराच्या कालावधीत एकामागोमाग एक प्रचंड वणवे पेटले असून बहुतांश वणवे अ‍ॅमेझॉन जंगलक्षेत्रातील आहेत. लाकूडतोड करणारे व्यावसायिक व शेतकर्‍यांकडून या आगी लावण्यात आल्याचे दावे स्वयंसेवी गटांकडून करण्यात आले आहेत. ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी अ‍ॅमेझॉनमध्ये लागलेल्या वणव्यांमागे स्वयंसेवी गट असल्याचाही आरोप केला होता. मात्र त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.

ब्राझिलसह अ‍ॅमेझॉन जंगलांचा भाग असणार्‍या लॅटिन अमेरिकेतील इतर देशांमध्येही वणवे भडकले आहेत. सूत्रांच्या दाव्यानुसार ब्राझिलसह लॅटिन अमेरिकी देशांमध्ये जवळपास १० हजारांहून अधिक जागांवर आगी लागल्या आहेत. एकट्या ब्राझिलमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भडकलेल्या वणव्यांचे प्रमाण ८५ टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती सरकारी यंत्रणेकडून देण्यात आली. या देशातील जवळपास अडीच हजार किलोमीटर क्षेत्राला वणव्यांचा फटका बसला आहे.

अ‍ॅमेझॉनमधील या वणव्यांवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र व भावनिक प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिका व युरोपिय देशांमधील विविध नेते, कलाकार, क्रीडापटू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वणव्यांवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. फ्रान्समध्ये ‘जी७’ देशांची बैठक सुरू होत असल्याचे मॅक्रॉन यांनी केलेल्या आवाहनाकडे लक्ष वेधले गेले आहे. मात्र ब्राझिलने त्यावर टीकास्त्र सोडले असून मॅक्रॉन यांचे वक्तव्य वसाहतवादी मनोवृत्तीचा भाग आहे, असा आरोप केला आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info