चीन लोकशाहीचा मोठा शत्रू – तैवानच्या सरकारची टीका

चीन लोकशाहीचा मोठा शत्रू – तैवानच्या सरकारची टीका

तैपेई – ‘तैवानमध्ये आयोजित केलेल्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याच्या तयारीत असलेला चीन हा लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू आहे. चीनचा हा हस्तक्षेप तैवानी जनता कधीही खपवून घेणार नाही’, अशी घोषणा तैवानच्या सरकारने केली. तर फक्त तैवानच नाही तर हाँगकाँगमध्ये पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालांचाही चीनने आदर करावा, असा सल्ला तैवानच्या राष्ट्राध्यक्षा ‘त्साई ईंग-वेन’ यांनी दिला. हाँगकाँगमधील स्थानिक निवडणुकीत लोकशाहीवादी गटांचा दणदणीत विजय झाला असून हा चीनसाठी जबर धक्का असल्याचा दावा केला जातो. अशावेळी तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनवर निशाणा साधला आहे.

चीन, हस्तक्षेप, त्साई ईंग-वेन, लोकशाही, चीन, तैवान, नाटो चीन, हस्तक्षेप, त्साई ईंग-वेन, लोकशाही, चीन, तैवान, नाटो

गेल्या आठवड्यात ‘वँग लिकियांग’ या चिनी हेराने ऑस्ट्रेलियाकडे आश्रय मागितला होता. या हेराने ऑस्ट्रेलियन माध्यमांशी बोलताना, चीन तैवान व हाँगकाँगमधील निवडणूकीत हस्तक्षेप करीत असल्याची माहिती उघड केली होती. तैवानच्या स्वातंत्र्याची हाक देणार्‍या राष्ट्राध्यक्षा ‘त्साई ईंग-वेन’ यांना सत्तेवरुन दूर करण्यासाठी चीन येत्या निवडणुकीत धांदली करण्याची योजना आखल्याचा दावा या चिनी हेराने केला होता.

तर तैवानच्या राष्ट्राध्यक्षा ‘त्साई’ यांचे विरोधक व ‘कुओमिंतांग’ या पक्षाचे नेते ‘हान कुओ-यू’ यांची सकारात्मक प्रतिमा तैवानी जनतेसमोर नेण्यासाठी चीन तैवानी माध्यमांचा वापर करीत असल्याचे वँग याने सांगितले. त्याचबरोबर चीनने ‘हान कुओ-यू’ यांना निवडणुकीसाठी पैसा पुरविल्याची माहिती चिनी हेराने दिली. पण हान यांनी आपल्यावरील हा आरोप फेटाळला.

या पार्श्‍वभूमीवर, तैवानच्या सत्ताधारी ‘डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी’ या पक्षाचे अध्यक्ष ‘चो जूंग-ताय’ यांनी चीनवर ताशेरे ओढले. ‘चीन हा लोकशाहीचा शत्रू आहे. सध्याच्या काळात तैवानसाठी सर्वात महत्त्वाकांक्षी विरोधक आणि स्पर्धक देखील चीनच आहे’, याची जाणीव चो जूंग-ताय यांनी करून दिली. त्यामुळे तैवानी जनतेने चीनपासून सावध रहावे, अशी सूचना चीनच्या सत्ताधारी पक्षाने केली.

तर तैवानच्या राष्ट्राध्यक्षा ‘त्साई’ यांनी हाँगकाँगमध्ये जाहीर झालेल्या निवडणूक निकालाच्या पार्श्‍वभूमीवर, चीनला लोकशाहीची जाणीव करून दिली. तसेच चीनने हाँगकाँगच्या जनतेने दिलेल्या निकालाचा आणि लोकशाहीचा आदर करावा, असे आवाहन केले.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी देखील चीनच्या कम्युनिस्ट राजवटीवर टीका करून नाटोला इशारा दिला होता. सात दशकांपूर्वी सोव्हिएत रशियाकडून असलेल्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर, ‘स्वातंत्र्य’ व ‘लोकशाही’च्या सुरक्षेसाठी नाटोची स्थापना झाली होती. सोव्हिएत रशियाचा धोका टळला असला तरी नाटोसाठी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाकडून स्वातंत्र्य व लोकशाहीला ‘सोव्हिएत रशिया’ इतकाचा मोठा धोका असल्याचा इशारा परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी दिला.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info