Breaking News

अमेरिकी आरोग्यमंत्र्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर चीनच्या लढाऊ विमानांची तैवान हद्दीत घुसखोरी

तैपेई – अमेरिकेचे आरोग्यमंत्री अलेक्स अझार तैवान दौऱ्यावर असतानाच चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केल्याचे समोर आले. चीनच्या लढाऊ विमानांनी यावेळी तैवान व चीनमधील हवाईहद्दीची अघोषित मर्यादा ओलांडल्याची माहिती तैवानच्या अधिकाऱ्यांनी दिली. चीनच्या लढाऊ विमानांची ही घुसखोरी तैवानला देण्यात आलेला उघड इशारा होता असे सांगण्यात येते. याच पार्श्वभूमीवर साऊथ चायना मधील ‘डोंगशा आयलंड’वर तैवानने मरीन कॉर्प्सची तुकडी तैनात केल्याची माहिती देण्यात आली आहे.

चीनच्या लढाऊ विमानांची, तैवान, अमेरिका, चीन

अमेरिकेचे आरोग्यमंत्री अलेक्स अझार रविवारी तैवान दौऱ्यावर दाखल झाले. १९७९ साली तैवानशी राजनैतिक संबंध तोडल्यानंतर अमेरिकेकडून या देशाला भेट देणारे अझार हे सर्वोच्च राजनैतिक अधिकारी व नेते आहेत. सोमवारी सकाळी अमेरिकेच्या आरोग्यमंत्र्यांनी तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांची भेट घेतली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तैवानसाठी दृढ समर्थन व मैत्रीचा संदेश पाठविला आहे आणि हा संदेश पोचविणे माझ्यासाठी बहुमान आहे, असे आरोग्यमंत्री अलेक्स अझार यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी कोरोना साथीविरोधात तैवानने मिळवलेले यश आणि लोकशाही मूल्ये व पारदर्शक व्यवस्थेची प्रशंसा केली. अमेरिका व तैवानमध्ये आरोग्य क्षेत्रातील परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

अमेरिकी आरोग्यमंत्र्यांच्या भेटीगाठी सुरू असतानाच चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केल्याचे उघड झाले. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास चीनची जे-१० व जे-११ ही दोन लढाऊ विमाने तैवानच्या आखातातील हवाई हद्द ओलांडून तैवानच्या सीमेत घुसली. हवाई हद्द ओलांडून तैवानच्या सीमेत घुसखोरी करण्याची चिनी लढाऊ विमानांची २०१६ सालानंतरची ही तिसरी वेळ असल्याची माहिती तैवानी अधिकाऱ्यांनी दिली. चीनच्या लढाऊ विमानांची ही मोहीम अमेरिका व तैवान या दोघांसाठीही इशारा होता, असा दावा चिनी प्रसारमाध्यमे व विश्लेषकांनी केला आहे.

चीनच्या लढाऊ विमानांची, तैवान, अमेरिका, चीन

चिनी विमानांच्या या घुसखोरीची गंभीर दखल घेत तैवानच्या हवाईदलाने त्यांना पिटाळून लावले. ह्यासाठी तैवानने प्रथमच आपल्याकडील ‘एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिम’चा वापर केल्याची माहिती देवांच्या हवाईदलाने दिली. तैवानकडून झालेला क्षेपणास्त्र यंत्रणेचा वापर चिनी लढाऊ विमानांच्या घुसखोरीचा वाढता धोका अधोरेखित करणारा ठरला आहे. गेल्याच महिन्यात तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनच्या घुसखोरीकडे लक्ष वेधताना हे चिनी आक्रमणाचा धोका वाढल्याचे संकेत असू शकतात, अशी चिंता व्यक्त केली होती.

दरम्यान, चीनच्या वाढत्या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी तैवानने लष्करी पातळीवर वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. तैवानच्या संरक्षणदलाने साऊथ चायना सीमधील डोंगशा आयलंड भागात मरीन कॉर्प्सची तुकडी तैनात केली आहे. सुमारे २०० जवानांचा समावेश असलेल्या या तुकडीला अमेरिकी लष्कराकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. चीनकडून आता तैवानवर आक्रमण झाल्यास पहिला हल्ला डोंगशा आयलंडवर होईल, असे सांगण्यात येते. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून नुकत्याच करण्यात आलेल्या काही युद्धसरावांमध्ये या बेटावरील हल्ल्याची रंगीत तालीम घेण्यात आल्याचा दावा चिनी प्रसारमाध्यमे व विश्लेषकांनी केला होता.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info