Breaking News

शांतता हवी असेल तर युद्धाला तयार रहा – युरोपिय महासंघाबरोबरील वाद पेटल्यानंतर रशियन परराष्ट्रमंत्र्यांचा देशवासियांना संदेश

शांतता, युद्धाचा पर्याय, सर्जेई लॅव्हरोव्ह, युरोपिय महासंघ, तणाव, रशिया, आयर्लंड, TWW, Third World War

मॉस्को/ब्रुसेल्स – अ‍ॅलेक्सी नॅव्हॅल्नीवरील कारवाईच्या मुद्यावरून युरोपिय महासंघ रशियावर नवे निर्बंध लादण्याची तयारी करीत आहे. या संभाव्य कारवाईवर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, शांतता कायम राखण्यासाठी रशिया युद्धाचा पर्यायही वापरू शकतो असा सज्जड इशारा परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी दिला. यावेळी लॅव्हरोव्ह यांनी रशिया युरोपिय महासंघाबरोबरील संबंध पूर्णपणे तोडून टाकू शकेल, अशी धमकीही दिली. त्यामुळे रशिया व युरोपिय महासंघामधील तणाव चांगलाच चिघळल्याचे संकेत मिळत आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे कट्टर विरोधक असणार्‍या अ‍ॅलेक्सी नॅव्हॅल्नी यांना अटक करून तुरुंगात धाडण्यात आले आहे. याविरोधात नॅव्हॅल्नी यांच्या समर्थकांनी व्यापक आंदोलन सुरू केले असून सलग तीन आठवडे रशियाच्या विविध शहरात निदर्शने सुरू आहेत. अमेरिका व युरोपिय देशांनी नॅव्हॅल्नी यांच्या सुटकेची मागणी केली असून दबाव टाकण्यासाठी निर्बंधांचा इशारा दिला आहे. त्यावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

शांतता, युद्धाचा पर्याय, सर्जेई लॅव्हरोव्ह, युरोपिय महासंघ, तणाव, रशिया, आयर्लंड, TWW, Third World War

युरोपिय महासंघ रशियावर नवे निर्बंध लादण्याची तयारी करीत आहे. तसे झाल्यास रशिया महासंघाबरोबरील संबंध तोडण्याचे पाऊलही उचलू शकतो. युरोपिय महासंघाने यापूर्वीही रशियावर निर्बंध लादले असून नव्या निर्बंधांमुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. रशियाला जगापासून वेगळे पडायची इच्छा नाही. मात्र आवश्यकता भासलीच तर रशियाने त्याचीही तयारी ठेवली आहे. शांतता हवी असले तर युद्धासाठी सज्ज रहावेच लागते’, असे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी बजावले.

शांतता, युद्धाचा पर्याय, सर्जेई लॅव्हरोव्ह, युरोपिय महासंघ, तणाव, रशिया, आयर्लंड, TWW, Third World War

युरोपिय महासंघाचे परराष्ट्र प्रमुख जोसेप बॉरेल यांनी काही दिवसांपूर्वी रशियाचा दौरा केला होता. मात्र त्याने संबंध सुधारण्याऐवजी अधिकच बिघडल्याचे समोर येत आहे. मंगळवारी बॉरेल यांनी स्वतःच आपण रशियाविरोधी निर्बंधांसाठी पुढाकार घेऊ, असा इशारा दिला. त्याचवेळी रशियन यंत्रणांना युरोपबरोबरील संबंध सुधारण्याची इच्छा नसल्याचा आरोपही केला. आपण लवकरच रशियाविरोधी निर्बंधांचा प्रस्ताव ठेऊ, असेही बॉरेल यांनी सांगितले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनीही नॅव्हॅल्नी प्रकरणावरून कठोर निर्बंध लादण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, युरोपिय संसदेतील आयर्लंडच्या संसद सदस्य क्लेर डॅली यांनी, रशियाविरोधातील कारवाईवरुन महासंघाला खडे बोल सुनावले आहेत. भूराजकीय कारणांवरून युरोपिय महासंघ रशियाला शत्रू बनण्यास भाग पाडत आहे, असा दावा डॅली यांनी केला. महासंघाच्या ‘रशियाफोबिक’ धोरणांवरही त्यांनी टीका केली. रशियाविरोधात एक व इतरांविरोधात दुसरे असे दुटप्पी धोरण राबविणार्‍या महासंघाने लोकशाहीबाबत धडे देऊ नयेत, असेही आयर्लंडच्या संसद सदस्यांनी बजावले.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info