इस्टोनियाची ‘सायबर आर्मी’ रशियाला प्रत्युत्तर देणार – इस्टोनियन अधिकार्‍याचा दावा

इस्टोनियाची ‘सायबर आर्मी’ रशियाला प्रत्युत्तर देणार – इस्टोनियन अधिकार्‍याचा दावा

तालिन – दहा वर्षांपूर्वी रशियाने इस्टोनियाच्या सरकारी व लष्करी संकेतस्थळांवर सायबर हल्ले चढवून पूर्ण यंत्रणा निकामी केली होती. रशियाकडून करण्यात येणार्‍या अशा प्रकारच्या सायबर हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी इस्टोनियाने ‘सायबर आर्मी’ तयार केली आहे. आपली ही सायबर आर्मी लवकरच रशियाला प्रत्युत्तर देईल, असा दावा इस्टोनियाच्या सायबर कमांडच्या प्रमुखांनी दिला.

‘सायबर आर्मी’, प्रत्युत्तर, अँड्रेस हैर्क, कर्नल, सायबर हल्ले, इस्टोनिया, दुसरे महायुद्ध

पूर्व युरोपमधील बाल्टिक देश इस्टोनिया हा सायबर हल्ल्याला बळी पडलेला पहिला देश होता. २००७ साली रशियन लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने इस्टोनियावर सायबर हल्ले चढविले होते. या सायबर हल्ल्यांमध्ये इस्टोनियाची सरकारी यंत्रणा पूर्णपणे कोलमडली होती. तसेच बँकिंग आणि माध्यम क्षेत्राचीही मोठी हानी झाली होती. इस्टोनियाने दुसर्‍या महायुद्धातील वास्तू राजधानीमधून इतर ठिकाणी हलविल्यामुळे खवळलेल्या रशियाने हे सायबर हल्ले चढविल्याचे उघड झाले होते.

‘सायबर आर्मी’, प्रत्युत्तर, अँड्रेस हैर्क, कर्नल, सायबर हल्ले, इस्टोनिया, दुसरे महायुद्ध

या सायबर हल्ल्याचे जगभरातून तीव्र पडसाद उमटले होते. अमेरिका तसेच युरोपिय देशांनी रशियाच्या या सायबर हल्ल्यांवर टीका केली होती. पण आता दहा वर्षानंतर रशियाच्या या सायबर हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपली सायबर कमांड सज्ज असल्याचे इस्टोनियाचे वरिष्ठ अधिकारी कर्नल अँड्रेस हैर्क यांनी जाहीर केले. रशियाच्या सायबर हल्ल्यांना परतावून लावण्याची सज्जता आपण मिळविल्याचा दावा कर्नल हैर्क यांनी केला आहे.

English हिंदी

 

Click below to express your thoughts and views on this news:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info