युक्रेनचे युद्ध दीर्घकाळ चालू शकेल

- नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग यांचा इशारा

नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग

ब्रुसेल्स/किव्ह – रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गुरुवारी रशियन सुरक्षा समितीच्या बैठकीत युक्रेनबरोबर शांती प्रस्तापित करण्याच्या मुद्यांवर चर्चा केली. रशियन राष्ट्राध्यक्ष आपल्या मागण्यांवर ठाम असून शांतीचर्चेबाबत आशावादी असल्याचा दावा रशियन माध्यमे करीत आहेत. तर येत्या काळात तुर्कीच्या मध्यस्थीने युक्रेनबरोबर शांतीचर्चा सुरू ठेवण्यासाठी रशिया उत्सूक असल्याचे तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेवलूत कावुसोग्लू यांनी म्हटले आहे. पण युक्रेनमधील हे युद्ध लवकर संपणार नसून पुढील काही महिने किंवा वर्षांसाठी हे युद्ध सुरूच राहील, असा इशारा नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी दिला. तसेच नाटोच्या सदस्य देशांनी या दीर्घकालिन युद्धाची तयारी करावी, असा संदेश स्टोल्टनबर्ग यांनी दिला आहे.

नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग

येत्या काही तासात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत रशियाचे स्थायी सदस्यत्त्व काढून घेण्यावर चर्चा होणार आहे. तसेच अमेरिका व युरोपिय देश रशियावर अधिकाधिक कठोर निर्बंध लादण्याची तयारी करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, बुधवारी नाटोने बु्रसेल्स येथे सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्री कुलेबा देखील उपस्थित होते. यानिमित्ताने युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नाटोकडे मोठ्या संख्येने शस्त्रसहाय्य पुरविण्याची मागणी केली.

नाटोच्या सदस्य देशांनी आपले मतभेद बाजूला सारून युक्रेनला शस्त्रसाठा पुरवावा, असे आवाहन कुलेबा यांनी केले. युक्रेनला नाटोकडून हवाई सुरक्षा यंत्रणा, रणगाडे, तोफा आणि लढाऊ विमानांची मोठी गरज आहे. यानंतर नाटोचे प्रमुख स्टोल्टनबर्ग यांनी देखील युक्रेनमधील युद्धाबाबत वास्तववादी राहण्याची आवश्यकता असून हे युद्ध दीर्घकाळ चालेल, असा इशारा दिला.

नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग

रशियाला युक्रेनमधील युद्ध संपवायचे नसून संपूर्ण युक्रेनचा ताबा घ्यायचा आहे, असा दावा स्टोल्टनबर्ग यांनी केला. तसेच नाटोच्या सदस्य देशांनी युक्रेनला शस्त्रसहाय्य करावे, असे आवाहन केले. तसेच रशियावर निर्बंध लादण्यासाठी आणि नाटोची सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी सदस्य देशांचे सहाय्य अपेक्षित असल्याचे स्टोल्टनबर्ग म्हणाले.

दरम्यान, अमेरिका व नाटो आवाहन करीत असले तरी युक्रेनविरोधी युद्धात नाटोमध्येच मतभेद असल्याचे याआधी उघड झाले आहे.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info