तुर्की चलन लिरातील विक्रमी घसरणीमुळे युरोपिय महासंघावर मंदीचे संकट – अर्थतज्ज्ञांचा इशारा

तुर्की चलन लिरातील विक्रमी घसरणीमुळे युरोपिय महासंघावर मंदीचे संकट – अर्थतज्ज्ञांचा इशारा

अंकारा/ब्रुसेल्स – तुर्कीचे चलन लिरामध्ये अवघ्या २४ तासात झालेली २० टक्क्यांची घसरण युरोपिय महासंघाच्या अर्थव्यवस्थेसमोर नवे संकट उभे करणारी ठरेल, असे संकेत मिळत आहेत. युरोपिय बँकांची जवळपास १०० अब्ज युरोहून अधिक कर्जे तुर्कीकडे थकित असून त्याची परतफेड न झाल्यास युरोपमधील बॅकिंग क्षेत्राला मोठा फटका बसू शकतो. हा फटका युरोपातील नव्या आर्थिक मंदीची चाहूल ठरेल, असा दावा अर्थतज्ज्ञांनी केला आहे. दरम्यान, लिरातील घसरण म्हणजे तुर्कीच्या शत्रूंनी आर्थिक युद्धात डागलेली क्षेपणास्त्रे असल्याचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी म्हटले आहे.

तुर्की चलन लिरा, घसरण, रेसेप एर्दोगन, अमेरिकी डॉलर, संघर्ष, ww3, तुर्की, स्पेनशुक्रवारी तुर्कीचे चलन लिरामध्ये सुमारे २० टक्क्यांची विक्रमी घसरण झाल्याचे समोर आले असून लिराचे मूल्य अमेरिकी डॉलरमागे ७ लिरापर्यंत घसरले होते. गेल्या वर्षभरात तुर्की लिराचे मूल्य अमेरिकी डॉलरच्या तुलनेत जवळपास ५० टक्क्यांपर्यंत घसरल्याचे उघड झाले असून नजिकच्या काळात ही घसरण चालू राहील, असे संकेत मिळत आहेत. शुक्रवारी झालेली विक्रमी घसरण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीवर लादलेल्या आयात कराचा परिणाम होता, असे सांगण्यात येते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तुर्कीबरोबरील संबंध चांगले राहिले नसल्याची कबुली देऊन अ‍ॅल्युमिनिअम व पोलादावरील कर लादण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, तुर्कीतून आयात होणार्‍या अ‍ॅल्युमिनिअमवरील कर तब्बल २० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला होता. त्याचवेळी पोलादाच्या आयातीवरील कर ५० टक्क्यांपर्यंत नेल्याचे जाहीर करण्यात आले होते. ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्विट’मध्ये तुर्कीचे चलन लिरा मजबूत अमेरिकी डॉलरविरोधात वेगाने घसरत असल्याचा टोलाही लगावला होता.

तुर्की चलन लिरा, घसरण, रेसेप एर्दोगन, अमेरिकी डॉलर, संघर्ष, ww3, तुर्की, स्पेनतुर्कीच्या चलनातील वेगवान घसरण अमेरिकेबरोबरील तीव्र संघर्षाचा परिणाम असल्याचे समोर आले आहे. मात्र तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन वारंवार देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचा दावा करीत आहेत. अमेरिकेकडून लादण्यात आलेले कर व निर्बंध हा आर्थिक युद्धाचा भाग असून तुर्कीचे चलन कमकुवत करण्याचा कट आखण्यात आला आहे, असे एर्दोगन यांनी सांगितले. त्यामुळे तुर्कीचे उत्पादन व खर्‍या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नसल्याचेही एर्दोगन यांनी स्पष्ट केले.

मात्र एर्दोगन काहीही दावे करीत असले तरी लिरातील घसरणीचा फटका युरोपला बसण्याचे संकेत मिळू लागले आहेत. युरोपमधील स्पेन, इटली व फ्रान्सच्या बँकांनी तुर्की उद्योगांना जवळपास १०८ अब्जाहून अधिक युरोचे कर्ज दिले आहे. या कर्जाची परतफेड वेळेत झाली नाही, महासंघातील बॅकिंग क्षेत्राला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. त्याचे पडसाद युरोपच्या बाजारपेठेवरही उमटू शकतात आणि त्यातून युरोपला आर्थिक मंदीचा फटका बसू शकतो, असा इशारा नील विल्सन या विश्‍लेषकांनी दिला.

अमेरिकेचे माजी राजनैतिक अधिकारी बॉब हॉरमॅट्स यांनीही तुर्कीच्या चलनाचे संकट युरोपातील बॅकिंग क्षेत्राला धक्का देणारे ठरेल, असे संकेत दिले आहेत. तुर्कीच्या अर्थव्यवस्थेत युरोपिय बँकांची मोठी गुंतवणूक आहे, याकडे अमेरिकी अधिकार्‍यांनी लक्ष वेधले.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info