चेटूकविद्येच्या हल्ल्यापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना वाचविण्यासाठी प्रार्थना करा – ख्रिस्ती धर्मोपदेशक पास्टर किलपॅट्रिक यांचे आवाहन

चेटूकविद्येच्या हल्ल्यापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना वाचविण्यासाठी प्रार्थना करा – ख्रिस्ती धर्मोपदेशक पास्टर किलपॅट्रिक यांचे आवाहन

मॉन्ट्गोम्र्री – चेटूकविद्येचे उपासक अमेरिका ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्ला चढवल्यावाचून राहणार नाहीत. म्हणूनच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या रक्षणासाठी अमेरिकन जनतेने प्रार्थना करावी’, असे आवाहन ख्रिस्ती धर्मोपदेशक ‘पास्टर जॉन ए. किलपॅट्रिक’ यांनी केले आहे. याला फार मोठा प्रतिसाद मिळत असून विशेषतः सोशल मीडियावर लाखोजणांनी त्यांचा हा संदेश पाहिल्याचे समोर आले आहे.

चेटूकविद्या, हल्ला, जॉन ए. किलपॅट्रिक, धर्मोपदेशक, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, प्रार्थना, WW3, अमेरिका, रिपब्लिकन पक्ष, बायबल२००६ साली ‘चर्च ऑफ हिज् प्रेझेन्स’ची स्थापना करणार्‍या ‘पास्टर किलपॅट्रिक’ यांनी चेटुकविद्या तसेच सैतानी शक्तींकडून अमेरिका ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला. यासाठी ते डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आपल्या अशुभ विद्यांच्या सहाय्याने हल्ला चढविणार आहेत, असे सांगून पुढच्या काळात या चेटुकविद्येच्या उपासकांचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावरील हल्ला भयावह असेल, असे बजावले आहे. यापासून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या रक्षणासाठी जनतेने प्रार्थना करावी व परमेश्‍वराची करुणा भाकावी, असा संदेश ‘पास्टर किलपॅट्रिक’ यांनी दिला.

हा संदेश देत असताना, आपण राजकीय हेतूने प्रेरित नसल्याचेही ‘पास्टर किलपॅट्रिक’ यांनी म्हटले आहे. तसेच आपला पाठिंबा ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला नाही. डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन हे दोन्ही पक्ष आपला तितकाच तिरस्कार करतात, असे ‘पास्टर किलपॅट्रिक’ यांनी स्पष्ट केले. तसेच आपण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करीत असतो, तरी ते सुद्धा काही देवदूत नाहीत, त्यांनीही चूका केलेल्या आहेत, याकडे ‘पास्टर किलपॅट्रिक’ यांनी लक्ष वेधले.

मात्र असे असले तरी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे कणखर व्यक्ती असून कदाचित परमेश्‍वर त्यांचा वापर करून अमेरिकेची घसरण थांबविण्याचा प्रयत्न करीत असावा. म्हणूनच आपण ट्रम्प यांच्यासाठी प्रार्थना करायला हवी, असे किलपॅट्रिक यांनी स्पष्ट केले. किलपॅट्रिक यांनी ट्रम्प यांच्यावर होणार्‍या चेटूकविद्येच्या उपासकांच्या हल्ल्याची माहिती आपल्याला परमेश्‍वराने दिली व हे ‘चर्च ऑफ हिज् प्रेझेन्स’च्या भाविकांना सांगण्याची आज्ञा परमेश्‍वरानेच आपल्याला केलेली आहे, असे पास्टर किलपॅट्रिक म्हणाले. त्याचवेळी पवित्र बायबलमधील गोष्टींचा दाखला देऊन किलपॅट्रिक यांनी आपले म्हणणे अधिक स्पष्टपणे मांडले आहे.

अमेरिकेचे ‘डीप स्टेट’ अर्थात गुप्तपणे हा देश नियंत्रित करणार्‍या व्यक्तींचा बलशाली गट राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मागे लागल्याचा दावाही यावेळी पास्टर किलपॅट्रिक यांनी केला. या हल्ल्यातून ट्रम्प यांना वाचविण्याचे आवाहन करून किलपॅट्रिक यांनी ट्रम्प यांचा निर्धार व त्यांची शक्ती अबाधित ठेवण्याची प्रार्थना केली. याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असून सोशल मीडियावर आठ लाखाहून अधिकवेळा हा व्हिडिओ पाहण्यात आल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, याआधीही अमेरिकेतील ख्रिस्तधर्मिय उपदेशकांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर काळ्या विद्येचे प्रयोग होणार असल्याचा दावा करून ट्रम्प यांच्यासाठी प्रार्थनासभेचे आयोजन केले होते. अमेरिकन जनतेने ट्रम्प यांच्यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन यावेळीही करण्यात आले होते.

English हिन्दी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info