रशियन संरक्षणदले युद्धासाठी सज्ज – राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची ग्वाही

रशियन संरक्षणदले युद्धासाठी सज्ज – राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची ग्वाही

मॉस्को – तीन लाख सैनिक, ३६ हजार रणगाडे व सशस्त्र वाहने, एक हजारांहून अधिक लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स व ड्रोन्स आणि ८० युद्धनौका व पाणबुड्यांचा समावेश असलेल्या ‘वोस्तोक-२०१८’ या भव्य युद्धसरावाला रशियात सुरुवात झाली असून गुरुवारी राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सरावाला भेट दिली. यावेळी पुतिन यांनी रशियन संरक्षणदले युद्धासाठी पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही दिली. मातृभूमी रशियाचे सार्वभौमत्व, सुरक्षा व हितसंबंध जपण्यासाठी तसेच सिरियासारख्या मित्रदेशांना आश्‍वस्त करण्यासाठी हा सराव आवश्यकच होता, अशा शब्दात त्यांनी ‘वोस्तोक-२०१८’चे समर्थन केले.

रशियाच्या अतिपूर्वेकडील सैबेरियामध्ये ‘वोस्तोक-२०१८’ या युद्धसरावाचे आयोजन करण्यात आले असून ४० वर्षांपूर्वी सोव्हिएत रशियाचे विभाजन झाल्यानंतर पहिल्यांदाच रशिया आपल्या लष्करी सामर्थ्याचे इतक्या मोठ्या प्रमाणात सर्वोच्च्च प्रदर्शन करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. रशियाने आयोजित केलेल्या या भव्य युद्धसरावात चीन व मंगोलियाही सहभागी झाले आहेत. चीनकडून तीन हजारांहून अधिक सैनिक, ९००हून अधिक रणगाडे व सशस्त्र वाहने, २४ हेलिकॉप्टर्स व सहा लढाऊ विमाने ‘वोस्तोक-२०१८’साठी पाठविण्यात आली आहेत.

व्लादिमिर पुतिन, ग्वाही, वोस्तोक-२०१८, Vostok, नाटो, युद्धसराव, ww3, रशिया, जपान

सैबेरियासह ‘सी ऑफ जपान’, ‘बेरिंग सी’ व ‘सी ऑफ ओखोत्स्क’मध्ये युद्धसरावाचे आयोजन करण्यात आले आहे. नाटोसह अमेरिका तसेच जपानने रशियाच्या या भव्य युद्धसरावावर जोरदार टीका केली आहे. काही विश्‍लेषकांनी हा सराव म्हणजे रशिया व चीनच्या अमेरिकाविरोधी धोरणातील महत्त्वाचा टप्पा असल्याचा दावा केला आहे. मात्र रशियाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

‘वोस्तोक-२०१८’ युद्धसरावाच्या माध्यमातून रशियाने आपल्या संरक्षणदलांचे सामर्थ्य दाखवून दिल्याचा दावा करून रशिया कोणत्याही लष्करी धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे, अशी ग्वाही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिली. त्याचवेळी रशिया यापुढे आपल्या संरक्षणदलांना प्रगत शस्त्रास्त्रे व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मजबूत करण्याचे कार्य सुरूच ठेवणार आहे, असा इशाराही दिला.

यापूर्वी रशियाने २०१४ साली वोस्तोक युद्धसरावाचे आयोजन केले होते. त्यानंतर यावर्षी करण्यात आलेला ‘झॅपड’ युद्धसरावही रशियन संरक्षणदलाच्या इतिहासातील मोठ्या युद्धसरावांपैकी एक म्हणून ओळखण्यात येतो.

English  हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info