चिनी कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या ‘पॅसिफिक नेशन्स’ना सहाय्य करण्यासाठी जपान व न्यूझीलंडची धोरणात्मक भागीदारी

चिनी कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या ‘पॅसिफिक नेशन्स’ना सहाय्य करण्यासाठी जपान व न्यूझीलंडची धोरणात्मक भागीदारी

ऑकलंड – चीनकडून पॅसिफिक महासागरातील ‘आयलंड नेशन्स’ना कर्जाच्या विळख्यात अडकविण्यात आल्याची नाराजी व्यक्त करून, जपान व न्यूझीलंडने त्यांना सहाय्य करण्यासाठी धोरणात्मक भागीदारी स्थापन करण्यावर एकमत दर्शविले. जपानचे परराष्ट्रमंत्री तारो कोनो न्यूझीलंडच्या दौर्‍यावर असून यावेळी त्यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डन यांच्यासह परराष्ट्रमंत्री तसेच संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली.
जपान व न्यूझीलंड, धोरणात्मक भागीदारी, तारो कोनो, चीन, सहाय्य, world war 3, ऑकलंड, ऑस्ट्रेलियाआशिया-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या वाढत्या वर्चस्वाला रोखण्यासाठी अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया, जपान, भारत व न्यूझीलंडने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाच्या एका वरिष्ठ मंत्र्यांनी चीनच्या पॅसिफिक क्षेत्रातील हस्तक्षेपाला लक्ष्य केले होते. चीनने पॅसिफिक क्षेत्रातील आठ ‘आयलंड नेशन्स’ना जवळपास दोन अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्य व कर्ज दिले असून ते फेडण्याची वेळ आल्यास काय परिणाम होतील याबद्दल काहीच सांगता येत नाही, असे ऑस्ट्रेलियाच्या ‘इंटरनॅशनल डेव्हलपमेंट’ विभागाच्या मंत्री ‘कॉन्सेटा फिरॅव्हॅन्टी-वेल्स’ यांनी बजावले होते.

जपान व न्यूझीलंड, धोरणात्मक भागीदारी, तारो कोनो, चीन, सहाय्य, world war 3, ऑकलंड, ऑस्ट्रेलियात्यानंतर अमेरिका-जपान व ऑस्ट्रेलियाने चीनचा पॅसिफिक क्षेत्रातील प्रभाव रोखण्यासाठी नवी आघाडी उघडण्याचे संकेत दिले होते. तर न्यूझीलंडने ‘पॅसिफिक रिसेट’ धोरण जाहीर करून या क्षेत्रातील देशांसाठी सुमारे 50 कोटी डॉलर्सच्या अतिरिक्त अर्थसहाय्याची तरतूद जाहीर केली होती. या पार्श्‍वभूमीवर जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा न्यूझीलंड दौरा महत्त्वाचा मानला जातो. जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी गेल्या पाच वर्षात न्यूझीलंडचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

यावेळी पंतप्रधान आर्डन तसेच परराष्ट्रमंत्री विन्स्टन पीटर्स यांच्याशी झालेल्या चर्चेत चीन, पॅसिफिक क्षेत्र व उत्तर कोरियाच्या मुद्यावर चर्चा झाल्याचे जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले. जपान व न्यूझीलंड एकत्रितरित्या पॅसिफिक क्षेत्रातील देशांना सहाय्य पुरविण्यासाठी पुढाकार घेतील, अशी ग्वाहीदेखील दोन्ही देशांच्या मंत्र्यांकडून देण्यात आली. न्यूझीलंडच्या पंतप्रधान आर्डन यांनी जपानबरोबर धोरणात्मक सहकार्य भागीदारीसाठी सकारात्मक भूमिका घेतल्याची माहितीही जपानच्या परराष्ट्र विभागाने दिली आहे.

English  maxbutton id=”1″ url=”https://worldwarthird.com/index.php/2018/10/16/japan-new-zealand-strategic-partnership-rescue-pacific-nations-china-debt-trap-hindi/” ]

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info