‘आयएनएफ’मधील अमेरिकेच्या माघारीचे ब्रिटनकडून समर्थन

‘आयएनएफ’मधील अमेरिकेच्या माघारीचे ब्रिटनकडून समर्थन

न्यूयॉर्क – ‘रशियाबरोबरच्या ‘इंटरमीडिएट-रेंज न्युक्लिअर फोर्सेस’ (आयएनएफ) या अण्वस्त्र करारातून माघार घेऊन अमेरिकेने रशियाला योग्य तो संदेश दिला’, असे सांगून ब्रिटनचे संरक्षणमंत्री गॅव्हिन विल्यमसन यांनी अमेरिकेच्या निर्णयाचे समर्थन केले. या कराराचे वारंवार उल्लंघन करून रशियाने अमेरिकेचा अवमान केल्याची जळजळीत टीका ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांनी केली.

‘आयएनएफ’, माघार, Intermediate-Range Nuclear Forces, रशिया, आक्रमक हालचाली, world war 3, फ्रान्स, जर्मनी, हैको मासअमेरिका हा ब्रिटनचा निकटतम आणि फार जुना सहकारी देश असून रशियाविरोधातील या निर्णयाबाबत ब्रिटन अमेरिकेच्या कायम पाठिशी असेल, असे विल्यमसन म्हणाले. ‘अमेरिका व रशियात झालेला हा सामंजस्य करार टिकला असता तर चांगले झाले असते. पण या कराराचा अनादर करणार्‍या रशियाला स्पष्ट संदेश देण्यासाठी यातून बाहेर पडण्याचीच आवश्यकता होती’, असे ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.

अमेरिकेच्या दौर्‍यावर असलेल्या विल्यमसन यांनी अमेरिकेच्या माघारीसाठी रशियाला जबाबदार धरले. ‘‘कोणताही द्विपक्षीय करार टिकविण्यासाठी दोन्ही गटांनी संबंधित नियमांचे पालन करणे आवश्यक असते. पण या ठिकाणी अमेरिकाच ‘आयएनएफ’च्या नियमांचे पालन करीत होती, तर रशियाने याचे उल्लंघन केले. त्यामुळे हा करार टिकवायचा असेल तर रशियाला आपल्या भूमिकेत सुधारणा करावी’’, असा सल्ला ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांनी दिला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘आयएनएफ’बाबत घेतलेल्या निर्णयाचे सत्ताधारी रिपब्लिकन पक्षातील काही सिनेटर्सनी स्वागत केले. रशियाच्या आक्रमक हालचालींना वेळीच इशारा देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी योग्य निर्णय घेतल्याचे सिनेटर टॉम कॉटन यांनी म्हटले आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे विरोधक त्यांच्या या निर्णयावर टीका करीत आहेत.

‘आयएनएफ’ प्रकरणात फ्रान्स-जर्मनी रशियाच्या बाजूने

‘आयएनएफ’, माघार, Intermediate-Range Nuclear Forces, रशिया, आक्रमक हालचाली, world war 3, फ्रान्स, जर्मनी, हैको मास

बर्लिन/पॅरिस – फ्रान्स व जर्मनीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘आयएनएफ’बाबतच्या निर्णयावर इशारे दिले आहेत. रशियाबरोबरचा ‘आयएनएफ’ करार हा युरोपच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा होता, असा दावा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी केला. तर सदर करारातून माघार घेणार्‍या अमेरिकेने यापुढील परिणामांसाठी तयार रहावे, असा इशारा जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला.

अमेरिका व रशियातील ‘आयएनएफ’ हा ऐतिहासिक करार अण्वस्त्रांच्या चाचणीवर बंदी टाकणारा होताच पण त्याचबरोबर युरोपिय देशांच्या सुरक्षेसाठी देखील तितकाच महत्त्वाचा होता, असे फ्रान्स व जर्मनीने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. युरोपच्या सुरक्षेतील ‘आयएनएफ’ हा महत्त्वाचा आधारस्तंभ होता, असे सांगून अमेरिकेच्या माघारीमुळे युरोपिय देशांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असे संकेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी दिले.

जर्मनीचे परराष्ट्रमंत्री ‘हैको मास’ यांनी रशियाबरोबरच्या या करारातून माघार घेणार्‍या अमेरिकेने आपल्या निर्णयाच्या परिणामांसाठी तयार रहावे, असे बजावले आहे.

 

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info