होय! रशिया अमेरिकेविरोधात युद्धाची तयारी करीत आहे – रशियाच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकार्‍याचा संयुक्त राष्ट्रसंघातील इशारा

होय! रशिया अमेरिकेविरोधात युद्धाची तयारी करीत आहे – रशियाच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकार्‍याचा संयुक्त राष्ट्रसंघातील इशारा

न्यूयॉर्क – ‘रशिया युद्धाची तयारी करीत आहे, असा आरोप नुकत्याच झालेल्या एका बैठकीत अमेरिकेने केला होता. आता मी हे ठामपणे सांगत आहे की, होय! रशिया युद्धाची तयारी करीत आहे. अमेरिकेच्या आक्रमणाविरोधात रशियन भूमी व रशियन जनतेचे संरक्षण करणे शक्य व्हावे यासाठी रशिया युद्धाची तयारी करीत आहे’, अशा थेट शब्दात रशियाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी अमेरिकेविरोधातील संघर्षासाठी रशिया सज्ज असल्याचा इशारा दिला.

रशिया, युद्धाची तयारी, आंद्रे बेलोसोव, संयुक्त राष्ट्रसंघ, युद्धसराव, world war 3, अमेरिका, INF treaty

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच रशियाबरोबरील अण्वस्त्रकरारातून, अमेरिका बाहेर पडत असल्याची घोषणा केली होती. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी रशियाला भेट देऊन ही गोष्ट थेट रशियन नेतृत्त्वाला कळविल्याचेही उघड झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर, रशियाकडून आक्रमक इशारे देण्यात येत असून अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे बजावले जात आहे. त्यामुळे रशियाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून संयुक्त राष्ट्रसंघासारख्या व्यासपीठावर उघडपणे युद्धसज्जतेचा इशारा सार्‍या जगाचे लक्ष वेधून घेणारा ठरतो.

‘रशियाकडून होणारी लष्करी तैनाती, भव्य युद्धसराव या गोष्टी म्हणजे रशिया सर्वसंहारक युद्धासाठी तयारी करीत आहे, असे चित्र पाश्‍चात्य माध्यमांकडून रंगविण्यात येते. प्रत्यक्षात या गोष्टी संरक्षणासाठी आवश्यक म्हणून केल्या जातात. रशियन संरक्षणदले आपली मातृभूमी, आपली जनता, आपली मूल्ये यांच्या संरक्षणासाठी ही तयारी करीत आहे’, असे रशियन परराष्ट्र विभागाचे अधिकारी आंद्रे बेलोसोव यांनी बजावले.

रशिया, युद्धाची तयारी, आंद्रे बेलोसोव, संयुक्त राष्ट्रसंघ, युद्धसराव, world war 3, अमेरिका, INF treaty

अमेरिका स्वतःची अण्वस्त्रसज्जता वाढवून रशियाबरोबरील आण्विक करारातून बाहेर का पडते आहे, हा मोठा प्रश्‍न आहे अशा शब्दात बेलोसोव यांनी अमेरिकेच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघातील सदस्य देशांनी ‘आयएनएफ’ करारावर मांडलेल्या ठरावाला केलेल्या विरोधावरही नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी रशियाला अमेरिकेशी संघर्ष नको आहे, असेही बेलोसोव्ह यांनी स्पष्ट केले.

रशियन अधिकारी उघडपणे युद्धसज्जतेबाबत इशारे देत असतानाच, अमेरिकेनेही युद्धाची जोरदार तयारी सुरू केल्याचे समोर येत आहे. अमेरिकेचा युरोपातील सर्वात मोठा तळ असलेल्या ‘रॅमस्टेन एअरबेस’वर तब्बल १०० कंटेनर इतक्या प्रचंड प्रमाणात शस्त्रसामुग्री दाखल झाली आहे. १९९९ सालानंतर एखाद्या युरोपिय देशात अमेरिकेने इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रे पाठविण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सध्या युरोपात भव्य युद्धसराव सुरू असून त्यानंतर अमेरिका युरोपिय देशांमधील तैनाती वाढविणार आहे. सदर शस्त्रसाठा त्याचा भाग असावा, असे मानले जात आहे. त्याचवेळी अमेरिकेने पॅसिफिक महासागरातील हवाई बेटांनजिक ‘एजिस’ या ‘अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टीम’ची नवी चाचणी घेतल्याचे जाहीर केले आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info