पाकिस्तानी वंशाच्या ‘गँग्ज्’चा ब्रिटनच्या महिलांवरील अत्याचारांचा भयंकर कट- एकाच शहरात दीड हजाराहून अधिक प्रकरणे उघडकीस

लंडन  – 1998 ते 2005 या काळात महिलांवर बलात्कार, लैंगिक छळ व त्यांना जबरदस्तीने डांबून ठेवण्यासारख्या भयंकर गुन्ह्यात सहभागी असलेल्या सात जणांना ब्रिटनच्या ‘शेफिल्ड क्राऊन’ न्यायालयाने दोषी ठरविले आहे. हे सारे आशियाई असल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. पण अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांची संख्या ब्रिटनमध्ये प्रचंड प्रमाणात वाढत चालली असून यामागे कटकारस्थान असल्याचे दावे समोर येऊ लागले आहे. ब्रिटनच्या लोकप्रतिनिधी सारा चॅम्पियन यांनी महिलांवरील लैंगिक गुन्ह्यांमागे पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांच्या टोळ्या असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर ब्रिटनमध्ये खळबळ माजली होती व काहीजणांनी चॅम्पियन यांच्यावर वंशद्वेषाचे आरोप केले होते. मात्र गेल्या आठवड्यात ‘शेफिल्ड क्राऊन’ न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ब्रिटनच्या माध्यांना सारा चॅम्पियन यांनी दिलेल्या इशार्‍याची आठवण झाली आहे.

महिलांवरील अत्याचार, सामुहिक अत्याचार, शेफिल्ड क्राऊन न्यायालय, पाकिस्तानी वंशाच्या गँग्ज्, लंडन, नॅशनल क्राईम एजन्सीमोहम्मद इम्रान अली अख्तर, नबील खुर्शिद, इकलाख युसूफ, तन्वीर अली, सलाह अहमद अल् हकम, असीफ अली यांच्यासह आणखी एकाला सामुहिक लैंगिक अत्याचार व तशाच स्वरुपाच्या गंभीर गुन्ह्यांसाठी ‘शेफिल्ड क्राऊन’ न्यायालयाने दोषी ठरविले. तांत्रिक कारणांमुळे यातील एकाचे नाव उघड करण्यात आलेले नाही. तसेच हे सारे जण कुठल्या वंशाचे आहेत, याचीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या निमित्ताने ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या भयंकर लैंगिक अत्याचारांची प्रकरणे ऐरणीवर आली आहे. ब्रिटनच्या गौरवर्णिय महिलांना कटकारस्थान आखून त्यांचे लैंगिक शोषण करण्याच्या अक्षरशः शेकडो घटनांची चौकशी सुरू झाली असून यातून धक्कादायक माहिती समोर येत असल्याचे सांगितले जाते.

ब्रिटनच्या एकट्या रॉदरहॅम भागात सामुहिक अत्याचार व लैेंगिक शोषण झालेल्या तरुणींची संख्या दीड हजाराहून अधिक असल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले आहे. 2010 सालापासून अशा स्वरुपाच्या घटना समोर येऊ लागल्या होत्या. 2015 साली ब्रिटनच्या ‘नॅशनल क्राईम एजन्सी’ने या संदर्भात स्वतंत्र मोहीम हाती घेतली. याला ‘ऑपरेशन स्टोव्हवूड’ असे नाव देण्यात आले होते. याच्या अंतर्गत आत्तापर्यंत 420 संशयितांची चौकशी सुरू झाली आहे. 1997 ते 2013 सालापर्यंत घडलेल्या अशा प्रकारच्या सर्व घटनांची चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले जाते. या तपासातून आत्तापर्यंत बाहेर आलेली माहिती भयावह असल्याचा दावा माध्यमे करू लागली आहेत. 2017 साली ब्रिटिश संसदेच्या सदस्या सारा चॅम्पियन यांनी एका नियतकालिकात यासंदर्भात इशारे दिले होते.

महिलांवरील अत्याचार, सामुहिक अत्याचार, शेफिल्ड क्राऊन न्यायालय, पाकिस्तानी वंशाच्या गँग्ज्, लंडन, नॅशनल क्राईम एजन्सीपाकिस्तानी वंशाच्या ब्रिटिश नागरिकांकडून गौरवर्णिय महिलांवर अत्याचार केले जात असून या गुन्ह्यांची संख्या भयावहरित्या वाढत असल्याची नोंद चॅम्पियन यांनी या लेखात केली होती. इतकेच नाही, तर लोकप्रतिनिधी म्हणून वावरताना आपल्यालाही असुरक्षित वाटत असल्याचे चॅम्पियन म्हणाल्या होत्या.

या लेखानंतर चॅम्पियन यांच्यावर वंशद्वेषाचा आरोप झाला होता व त्याचे राजकीय परिणामही चॅम्पियन यांना सहन करावे लागले होते. पण आता पाकिस्तानी वंशाच्या गुन्हेगारांच्या टोळ्या कटकारस्थान आखून गौरवर्णिय महिलांना लक्ष्य करीत असल्याची बाब समोर येऊ लागली आहे. यामुळे माध्यमांनी 2017 चॅम्पियन यांनी लिहिलेला तो लेख व त्यातील दाव्यांकडे जनतेचे लक्ष वेधले आहे. 2017 साली किलियम नावाच्या एका संस्थेने दिलेल्या अहवालात ब्रिटनमध्ये ‘ग्रुमिंग गँग’ अर्थात महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍या टोळ्यांमध्ये 84 टक्के दक्षिण आशियातून ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्यांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले होते. यातील बहुसंख्य गुन्हेगार पाकिस्तानी वंशाचे इस्लामधर्मिय आहेत, असे या संस्थेने स्पष्टपणे बजावले होते. मात्र या अहवालाकडे ब्रिटनच्या यंत्रणे गंभीरपणे पाहिले नाही, अशी टीका सुरू झाली असून ब्रिटनच्या काही राजकीय पक्षांनी हा मुद्दा आता उचलून धरल्याचे दिसत आहे.

मराठी  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info