‘ब्रेक्झिट’साठी करार झाला नाही तर ब्रिटनमध्ये लष्करी तैनातीची तयारी – पाच हजार सैनिकांना सज्जतेचे आदेश

‘ब्रेक्झिट’साठी करार झाला नाही तर ब्रिटनमध्ये लष्करी तैनातीची तयारी – पाच हजार सैनिकांना सज्जतेचे आदेश

लंडन – ‘ब्रेक्झिट’च्या मुद्यावर करार न होता ‘नो डील’चा पर्याय निवडावा लागल्यास संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी तब्बल पाच हजार सैनिक तैनात करण्याची योजना आखण्यात आली आहे. ‘ऑपरेशन टेम्परर’ नावाने तयार असलेली ही योजना तीन वर्षांपूर्वी तयार करण्यात आली असून पंतप्रधान थेरेसा मे यांनी त्याच्या अंमलबजावणीचे संकेत दिले आहेत. चार महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तात ब्रिटीश पोलीसदलाने अशा स्वरूपाच्या तयारीला दुजोरा दिल्याचे उघड झाले होते.

करार, लष्करी तैनाती, थेरेसा मे, Brexit, हिंसा, ब्रिटन, युरोपिय महासंघब्रिटनमध्ये ब्रेक्झिटच्या मुद्यावरून जबरदस्त अनिश्‍चितता निर्माण झाली असून पंतप्रधान मे यांच्याविरोधात अविश्‍वास ठरावाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात सुमारे 40 संसद सदस्यांनी अविश्‍वास ठरावाचा प्रस्ताव समितीकडे सादर केल्याचे सांगण्यात येते. मात्र पंतप्रधान मे यांनी ही शक्यता फेटाळून लावली असून ‘ब्रेक्झिट’च्या मसुद्याला मंजुरी मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. मात्र त्याचवेळी सर्व प्रकारच्या शक्यता ध्यानात ठेऊन आपत्कालिन योजनांची तयारी सुरू झाल्याची माहिती ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी दिली.

ब्रिटनचे संरक्षणदलप्रमुख सर निक कार्टर यांनी, लष्कराच्या तैनातीला दुजोरा दिला असून ‘स्टँड बाय’चे आदेश देण्यात आल्याचे स्पष्ट केले. लष्कर स्थानिक पोलीस व सुरक्षायंत्रणांना कायदा तसेच सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या ब्रिटनचे 1,200 सैनिक 24 तासांसाठी कायमस्वरूपी दक्ष असल्याची माहितीही देण्यात आली. त्याव्यतिरिक्त आणीबाणीच्या स्थितीत अतिरिक्त 10 हजार सैनिक तातडीने तैनात होऊ शकतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

ब्रिटन व युरोपिय महासंघात झालेल्या एकमतानुसार, येत्या सहा महिन्यात म्हणजेच मार्च 2019 मध्ये ब्रिटन महासंघातून बाहेर पडणार आहे. मात्र महासंघातून बाहेर पडताना नक्की कोणते अधिकार व तरतुदी असाव्यात यावरून ब्रिटनच्या राजकीय वर्तुळात जोरदार अंतर्गत संघर्ष सुरू आहे. त्यामुळे महासंघातून बाहेर पडण्यासाठी ठरलेल्या मुदतीत करार होणार की नाही यावरून अस्वस्थता निर्माण झाली आहे.

ब्रिटीश पोलीसदलाच्या ‘नॅशनल पोलीस को-ऑर्डिनेशन सेंटर’ने, ‘ब्रेक्झिट’ करार न झाल्यास देशात कोणत्या प्रकारची स्थिती असेल, यासंदर्भात अहवाल तयार केला असून त्यात अराजकाचा इशारा दिला होता. ब्रिटन 29 मार्च, 2019ला बाहेर पडणार असून त्यापूर्वी तीन महिने किंवा त्यानंतर तीन महिने देशात मोठ्या प्रमाणावर हिंसा तसेच लुटमारीच्या घटना व गुन्हेगारीत वाढ दिसून येईल, असे संकेत अहवालात देण्यात आले होते.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info