पॅरिस – उदारमतवाद व भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे कट्टर पुरस्कर्ते असलेले फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या एकतंत्री सत्तेला देशातील हिंसक निदर्शनांनी जबरदस्त हादरा दिला आहे. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच देशाच्या कानाकोपर्यातून विविध स्तरांतून व मार्गांनी मॅक्रॉन यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर फ्रान्स सरकारला आंदोलकांपुढे झुकणे भाग पडले असून इंधनावर लादलेला कर स्थगित करण्यात आला आहे.
गेले तीन आठवडे फ्रान्सची राजधानी पॅरिससह देशाच्या कानाकोपर्यात राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या इंधनदरवाढीच्या निणर्ंयाविरोधात तीव्र निदर्शने सुरू आहेत. फ्रेंच सरकारने सुरुवातीला या निदर्शनांकडे दुर्लक्ष केल्याने गेल्या आठवड्यात त्यांनी अधिकच आक्रमक स्वरुप धारण केले. राजधानी पॅरिससह देशाच्या विविध भागांमध्ये रस्ते रोखून वाहतूक व इतर दळणवळण बंद पाडण्यात आले. त्याचवेळी पॅरिसमध्ये हजारो निदर्शकांनी सरकारविरोधी घोषणा देत निदर्शने सुरू केली.
‘यलो वेस्ट’ नावाने ओळखण्यात येणार्या निदर्शनांनी गेल्या आठवड्यात हिंसक वळण घेतले. राजधानीसह अनेक भागात गाड्या, इमारती, दुकाने यांची तोडफोड व जाळपोळ सुरू झाली. यात फ्रान्समधील ऐतिहासिक वास्तूही सुटल्या नाहीत. हा हिंसाचार सुरू असताना फ्रेंच सुरक्षायंत्रणांकडून करण्यात आलेली कारवाईही वादाचा विषय ठरली. निदर्शकांनी पोलिसांवर हल्ले करून आपण माघार घेणार नसल्याची उघड धमकी दिली. त्याविरोधात राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी सुरू केलेली आणीबाणीची तयारी आगीत अधिक तेल ओतणारी ठरली.
सोमवारी फ्रान्समधील अनेक शाळा बंद पाडण्यात आल्या आणि विद्यार्थ्यांनीही निदर्शनांना सुरुवात केली. सरकारने आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित राहण्याचे निदर्शकांनी नाकारले असून त्यामुळे सरकार व आंदोलनातील तिढा अधिकच तीव्र झाला. या पार्श्वभूमीवर, सरकारला माघार घेणे भाग पडले असून इंधनदरातील वाढ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘यलो वेस्ट’ नावाने सूरू झालेले आंदोलन राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या दीड वर्षांच्या कारकिर्दीत, सर्वात मोठे आव्हान ठरल्याचा दावा विश्लेषकांकडून करण्यात येत आहे. फ्रेंच प्रसारमाध्यमांनी या आंदोलनाची तुलना 1968 साली फ्रान्समध्ये झालेल्या व्यापक विद्यार्थी आंदोलनाशी केली आहे. या आंदोलनामुळे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष ‘चार्ल्स द गॉल’ यांना राजीनामा देणे भाग पडले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |