तीन आठवड्यांच्या कालावधीत नायजेरियातील दहशतवादी हल्ल्यात १७० बळी

तीन आठवड्यांच्या कालावधीत नायजेरियातील दहशतवादी हल्ल्यात १७० बळी

अबुजा – गेल्या तीन आठवड्यात नायजेरियाच्या ‘कदूना’ प्रांतात ‘फुलानी’ या कट्टरपंथियांनी चढविलेल्या हल्ल्यात १७० हून अधिक ख्रिस्तधर्मियांचा बळी घेतल्याची भयंकर बातमी समोर आली आहे. या गटाने केलेल्या हल्ल्यांमुळे कदूना प्रांतातील हजारो जण विस्थापित झाल्याचे बोलले जाते. दरम्यान, नायजेरियात दहशत पसरविणार्‍या ‘बोको हराम’ या दहशतवादी गटापेक्षाही ‘फुलानी’ हा कट्टरपंथियांचा गट खतरनाक असल्याचा दावा स्थानिक यंत्रणा करीत आहेत.

‘फुलानी’, दहशतवादी हल्ला, कदूना, ख्रिस्तधर्मिय, स्थलांतर, नायजेरिया, ww3, बोको हराम

मध्य नायजेरियाच्या कदूना प्रांतातील ‘इंकिरीमी’, ‘दोगोनोमा’ आणि ‘उंगवान गोरा’ या तीन भागात फुलानीच्या दहशतवाद्यांनी गेल्या आठवड्यात मोठा हाहाकार माजवला. या गावांमधील ५२ जणांना ठार केल्यानंतर फुलानीच्या दहशतवाद्यांनी येथील १४३ घरे उद्ध्वस्त केली. त्यानंतर या आठवड्यात रविवार आणि सोमवारी फुलानीच्या दहशतवाद्यांनी ‘उंवान बर्दे’, ‘गामू’, ‘गेर्ती’, ‘कानिकोन’ या गावातील ८५ जणांना ठार केले. या हल्ल्यात ठार झालेल्यांना दफन करण्यासाठी जमा झालेल्या गावकर्‍यांवरही दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यातही ३५ जण ठार झाल्याचा दावा केला जातो.

फुलानी या कट्टरपंथिय संघटनेकडून ख्रिस्तधर्मियांना निशाणा बनविल्याचा दावा स्थानिक यंत्रणा व नागरिक करीत आहेत. गेल्या तीन आठवड्यात या संघटनेने ख्रिस्तधर्मिय नागरिकांबरोबरच येथील प्रार्थनास्थळांनाही उद्ध्वस्त केले. या हल्ल्यांमुळे कदूना भागातील नागरिकांमध्य फुलानीच्या दहशतवाद्यांची भीती निर्माण झाली असून महिला आणि मुलांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. याआधीच नायजेरियामध्ये बोको हरामच्या दहशतवाद्यांनी अराजक माजविले होते.

दरम्यान, नायजेरियातील सत्ताधारी राजवटच ‘बोको हराम’ला सहाय्य करीत असल्याचे आरोप प्रसारमाध्यमांकडून झाले होते. गेल्या वर्षी नायजेरियातील लष्कराने एका विशेष मोहिमेअंतर्गत ‘बोको हराम’वर मोठी कारवाई करून या दहशतवादी संघटनेवर विजय मिळविल्याचा दावा केला होता. पण या दाव्यानंतरच नायजेरियातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये अधिक वाढ झाल्याचे दिसून आले होते.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info