काबुल विमानतळावरील स्फोटाच्या ‘प्लॅनर’ला ठार केल्याचा अमेरिकेचा दावा

ठार केल्याचा

वॉशिंग्टन/काबुल – दोन दिवसांपूर्वी काबुल विमानतळाजवळ आत्मघाती स्फोटाचे कारस्थान आखणाऱ्या ‘आयएस-के’च्या प्लॅनरला ठार केल्याचा दावा अमेरिकेच्या लष्कराने केला. अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवरील नांगरहार प्रांतात ही कारवाई केल्याचे अमेरिकेच्या लष्कराने स्पष्ट केले. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी या हल्ल्याचे आदेश दिल्याचे अमेरिकी प्रशासनाकडून आवर्जुन सांगितले जात आहे. याद्वारे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या विरोधातील संतापाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी त्याचा विशेष प्रभाव पडणार नाही, असा टोला बायडेन यांचे विरोधक मारत आहेत. त्यातच काबुल विमानतळावर आयएसच्या नव्या हल्ल्याची शक्यता वर्तवून व्हाईस हाऊसने बायडेन यांच्या अफगाणिस्तानविषयक धोरणातील गोंधळ अधिकच वाढविला आहे.

ठार केल्याचा

काबुल विमानतळावर झालेल्या स्फोटांसाठी ‘आयएस-खोरासन’ (आयएस-के किंवा आयएस-केपी) जबाबदार असल्याचा आरोप बायडेन प्रशासन व अमेरिकेच्या सेंट्रल कमांड-सेंटकॉमचे प्रमुख जनरल मॅकेन्झी यांनी केला होता. त्याचबरोबर अमेरिकी जवानांचा बळी घेणाऱ्या आयएस-खोरासनला याची किंमत मोजायला भाग पाडू, असा इशारा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दिला होता. त्यानंतर अवघ्या 36 तासात, शनिवारी पहाटे अमेरिकेच्या ‘एमक्यू9’ रिपर ड्रोन्सनी अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील नांगरहार प्रांतातील जलालाबाद शहराजवळ ड्रोन हल्ला चढविला.

काबुल विमानतळावर आत्मघाती हल्ल्याचा कट आखणारा आयएस-खोरासनचा प्लॅनर ठार केल्याचा दावा अमेरिकेच्या लष्कराने केला. या हल्ल्यात इतर कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे अमेरिकेच्या लष्कराने जाहीर केले. त्याचबरोबर या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेली रिक्षा आणि घराचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले. स्थानिकांनी देखील कानठळ्या बसविणारा स्फोट झाल्याची माहिती दिली. पण या हल्ल्यात काबुल हल्ल्याचा प्लॅनरचा ठार झाला का? दहशतवाद्याचा मृतदेह कुठे? या प्रश्‍नांचा अमेरिकेच्या लष्कराने खुलासा केलेला नाही.

ठार केल्याचा

त्याचबरोबर नांगरहार प्रांतात कारवाईद्वारे अमेरिकेचे लष्कराने आपल्यासमोरील अडचणी वाढविल्याचे आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक लक्षात आणून देत आहेत. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या जनरल मॅकेन्झी यांनी अफगाणिस्तानातील आयएस-खोरासनबाबत महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली होती. नांगरहार प्रांतात तालिबान आणि खोरासनच्या दहशतवाद्यांमध्ये झालेल्या संघर्षात खोरासन पूर्णपणे नष्ट झाली होती. तालिबानच्या हवाल्याने जनरल मॅकेन्झी यांनी हा दावा केला होता. असे असेल तर मग ‘आयएस-खोरासन’ अफगाणिस्तानात पुन्हा कशी प्रबळ झाली? तालिबान व खोरासन एकच तर नाही ना? असे असेल तर अमेरिका आपणहून दरोडेखोरांच्या हातात अफगाणिस्तानची चावी देत आहे का? असा सवाल आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक करीत आहेत.

दरम्यान, काबुल विमानतळावर आयएस-खोरासनच्या नव्या हल्ल्यांचा धोका असल्याचे बायडेन प्रशासनाने जाहीर केले आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या कुठल्याही नागरिकाने काबुल विमानतळाजवळ येण्यापेक्षा राहत्या घरातच थांबावे, अशी सूचना बायडेन प्रशासनाने केली. अमेरिकेने काबुल विमानतळ सोडण्याची तयारी केल्याच्या बातम्या येत आहेत. तर काबुल विमानतळाच्या बाहेरील चौक्यांवरील तालिबानच्या दहशतवाद्यांची संख्या वाढली आहे. पुढच्या काही तासात तालिबानचे दहशतवादी काबुल विमानतळाचा ताबा घेऊ शकतात, असा दावा केला जातो.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info