उत्तर कोरियाच्या हुकूमशहांच्या रशिया भेटीने चीन अस्वस्थ – अमेरिकी अभ्यासगटाच्या विश्‍लेषिकेचा दावा

उत्तर कोरियाच्या हुकूमशहांच्या रशिया भेटीने चीन अस्वस्थ – अमेरिकी अभ्यासगटाच्या विश्‍लेषिकेचा दावा

लंडन, दि. २७ (वृत्तसंस्था) – उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जॉंग-उन आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात झालेल्या ऐतिहासिक चर्चेचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वागत केले आहे. उत्तर कोरियाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी रशिया करीत असलेल्या सहकार्याबाबत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आभार व्यक्त केले आहे. पण किम जॉंग-उन यांनी चीनला बगल देऊन रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतल्यामुळे चीन अस्वस्थ झाला आहे. चीनला डावलून उत्तर कोरियन राष्ट्रप्रमुखांनी हा दौरा केल्यामुळे चीनची चिंता वाढल्याचा दावा विश्‍लेषिका ‘जेनी टाऊन’ यांनी केला.

North Korean Leader, Russia visit , Kim Jong-un, Dictator, discussions, Russia, China, North Koreaदोन दिवसांपूर्वी उत्तर कोरियन हुकूमशह ‘किम जॉंग-उन’ आपल्या आलिशान ट्रेनने रशियाच्या व्लादिवोस्तोकमध्ये दाखल झाले होते. उत्तर कोरियन राष्ट्रप्रमुखांनी याच शहरात रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेऊन चर्चा केली होती. या भेटीत त्यांनी अमेरिकेबरोबर झालेल्या वाटाघाटी आणि आपल्या मागण्या राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासमोर मांडल्या होत्या. रशियन राष्ट्राध्यक्षांनी देखील उत्तर कोरियन हुकूमशहांनी अण्वस्त्रबंदीसाठी स्वीकारलेल्या भूमिकेचे स्वागत केले होते. तसेच या वाटाघाटी यशस्वी होण्यासाठी उत्तर कोरियाच्या मागण्या अमेरिकेसमोर ठेवण्याचे जाहीर केले होते.

पण रशिया आणि उत्तर कोरियन राष्ट्रप्रमुखांमधील भेटीमुळे चीन अस्वस्थ झाल्याचा दावा अमेरिकेतील प्रसिद्ध अभ्यासगट ‘स्टिमसन सेंटर’च्या विश्‍लेषिका जेनी टाऊन यांनी केला आहे. ब्रिटनमधील एका रेडिओवाहिनीशी बोलताना टाऊन यांनी उत्तर कोरियाने हेतूपुरस्सर चीनला डावलून रशियाला भेट दिल्याचे म्हटले आहे. उत्तर कोरियन हुकूमशहांनी चीनचा मार्ग न धरता थेट रशियासमोर आपली भूमिका मांडल्यामुळे चीन चिंताग्रस्त आणि अस्वस्थ झाल्याचे टाऊन यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत उत्तर कोरियाच्या आण्विक किंवा क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबत चीनने मध्यस्थी केली होती. पण पहिल्यांदाच उत्तर कोरियन हुकूमशहाने चीनला किंमत न देता रशियाशी हातमिळवणी सुरू केल्याने चीन बेचैन झाल्याचे टाऊन यांचे म्हणणे आहे.

त्याचबरोबर या भेटीमुळे दोन महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित झाल्याची आठवण टाऊन यांनी करून दिली. उत्तर कोरियाच्या हुकूमशहांचा आत्मविश्‍वास वाढत असून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली भूमिका मांडत आहेत. त्यांचा वाढलेला आत्मविश्‍वास हा उत्तर कोरियावरील चीनचा प्रभाव कमी करणारा ठरतो, असा दावा टाऊन यांनी केला. रशिया भेटीनंतरही उत्तर कोरियन राष्ट्रप्रमुखांनी चीनला भेट देण्याचे टाळले आहे. त्यामुळे देखील चीनच्या चिंता अधिकच वाढल्याचे टाऊन यांनी ब्रिटिश रेडिओवाहिनीशी बोलताना सांगितले.

दरम्यान, पुतिन आणि उन यांच्यातील चर्चेचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वागत केले आहे. उत्तर कोरियाला अण्वस्त्रबंदीपर्यंत आणण्यासाठी ही भेट सहाय्यक ठरेल, असा विश्‍वास राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.

English      हिंदी

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info