Breaking News

अमेरिका इराणबरोबर ‘वास्तविक’ अणुकरार करण्यास तयार – राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा

कॅन्सास सिटी – काही तासांपूर्वी इराणला विदारक परिणामांचा इशारा देणार्‍या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबतची भूमिका सौम्य केली. ‘इराणबरोबर वास्तविक अणुकरार करण्यासाठी अमेरिका तयार आहे’, अशी घोषणा करून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणसमोर वाटाघाटींचा प्रस्ताव ठेवला. मात्र ओबामा प्रशासनाने इराणबरोबर केलेला अणुकरार अमेरिकेला संकटात टाकणारा होता, अशी टीका करून आपण असा करार करणार नाही, याची सुस्पष्ट जाणिव ट्रम्प यांनी इराणला करून दिली.

वास्तविक अणुकरार, वाटाघाटी, आयातुल्लाह खामेनी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, माघार, अमेरिका, दुसरे महायुद्धदुसर्‍या महायुद्धात लढलेल्या अमेरिकेच्या सैनिकांसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणबरोबरच्या अणुकरारातून माघार घेण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. हा अणुकरार अमेरिकेसाठी घातक होता, अशी टीका राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली. त्याचबरोबर इराणबरोबर नवा अणुकरार शक्य असल्याचे संकेतही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी यावेळी दिले. पण आपण इराणसोबत अणुकरार केला तर तो वास्तविक असेल, असे सांगून इराणला फाजिल सवलती मिळणार नसल्याचे ट्रम्प यांनी ठणकावले.

इराणला नव्या अणुकराराचा प्रस्ताव देण्याच्या दोन दिवस आधी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला गंभीर इशारा दिला होता. अमेरिकेने आर्थिक निर्बंध टाकून इराणची कोंडी करण्याचा प्रयत्न केला तर पर्शियन आखातातून पाश्‍चिमात्य देशांसाठी होणारी इंधनाची वाहतूक रोखण्याची धमकी इराणचे सर्वोच्च धर्मगुरु आयातुल्लाह खामेनी यांनी दिली होती. यावर खवळलेल्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला सज्जड इशारा देऊन इतिहासात कुणीही अनुभवले नसतील असे विदारक परिणामांना इराणला भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती. अमेरिका व युरोपमधील विश्‍लेषकांनी ट्रम्प यांची ही धमकी आधीपेक्षा खूपच गंभीर असल्याचे बजावले होते.

त्यानंतर पुढच्या दोन दिवसात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणला नव्या अणुकराराचा प्रस्ताव देऊन आपली भूमिका सौम्य झाल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, युरोपिय देशांनी इराणबरोबरच्या अणुकरारातून माघार घ्यावी, यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिलेल्या मुदतीला अवघा आठवडा शिल्लक आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प इराणविरोधात नव्या निर्बंधांची घोषणा करू शकतात. त्याआधी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणसमोर वाटाघाटींचा प्रस्ताव ठेवल्याचे दिसत आहे. नव्या अणुकराराचा प्रस्ताव स्वीकारला नाही, तर इराण कधीही विसरणार नाही, अशी कारवाई करण्याचा इशारा ट्रम्प यांनी याआधीच दिला होता.

English  हिंदी

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info