मानवजात वाचविण्यासाठी अवघे १८ महिने शिल्लक  – ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्स यांचा इशारा

मानवजात वाचविण्यासाठी अवघे १८ महिने शिल्लक  – ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्स यांचा इशारा

लंडन – ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनी ‘जग वाचविण्यासाठी अवघे १८ महिने शिल्लक आहेत’, असा थरकाप भरविणारा इशारा दिला. जागतिक हवामानबदलाचे संकट टाळण्यासाठी या अवधीत ‘व्यवहार्य उपाययोजना’ झाली नाही, तर मानवी अस्तित्व धोक्यात येईल, असे प्रिन्स चार्ल्स यांनी बजावले. कॉमनवेल्थ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक संबोधित करताना प्रिन्स चार्ल्स यांनी हा इशारा दिला. मात्र हा इशारा हवामानबदलाच्या संकटाशी निगडित नाही, तर त्या निर्णायक इशार्‍यामागे वेगळेच संकेत असल्याची चर्चा जाणकार करीत आहेत.

कॉमनवेल्थचे सदस्य असलेल्या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक लंडनमध्ये पार पडली. यामध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर देखील सहभागी झाले आहेत. प्रिन्स चार्ल्स यांनी या बैठकीत जागतिक हवामानबदलाच्या संकटावरून फार मोठा इशारा दिला. या संकटामुळे सार्‍या मानवजातीचा विनाश होऊ शकतो, असे प्रिन्स चार्ल्स यांनी बजावले. या संकटातून सुटका करून घेण्यासाठी अवघे १८ महिने शिल्लक आहेत. या काळात व्यवहार्य उपाययोजना झाल्या नाहीत, तर त्याचे विदारक परिणाम समोर येतील, असे प्रिन्स चार्ल्स म्हणाले.

पुढच्या वर्षात आफ्रिकन देश रवांडाची राजधानी किगाली येथे कॉमनवेल्थची बैठक होणार आहे. त्या बैठकीच्या आधी तुम्ही व तुमच्या नेत्यांनी हे संकट टाळण्यासाठी आवश्यक असलेली व्यवहार्य पावले उचललेली बरी. कॉमनवेल्थ देशांनी सर्वांसमोर याबाबत आदर्श उभा करावा’, अशी अपेक्षाही प्रिन्स चार्ल्स यांनी व्यक्त केली आहे. या संकटावर मात करण्यासाठी कॉमनवेल्थने पुढाकार घ्यावा, असे आपले स्पष्ट मत असल्याचे प्रिन्स चार्ल्स पुढे म्हणाले.

दरम्यान, या समस्येवर मात करण्यासाठी जगाकडे अवघा दीड वर्षाचा कालावधी उरलेला आहे, असे सांगून प्रिन्स चार्ल्स यांनी खळबळ माजविली आहे. त्यांचा हा इशारा हवामानबदलाशी निगडित नाही. तर त्यामागे गर्भित इशारे असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रिन्स चार्ल्स यांनी आपल्या या संदेशाद्वारे जगाला वेगळाच इशारा दिला आहे. त्याचा हवामानबदलाशी संबंध जोडणे कठीण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. काही ‘कॉन्सिरसी थिएरिस्ट’ ब्रिटनच्या राजघराण्याची भूमिका नेहमीच संशयास्पद असल्याचे सांगून या राजघराण्यावर गंभीर आरोप करीत आले आहेत.

ब्रिटनच्या महाराणी क्विन एलिझाबेथ ९३ वर्षांच्या आहेत. पुढच्या काळात त्या महाराणीपदावर राहणार असल्या तरी प्रिन्स चार्ल्स महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडतील, असा दावा ब्रिटनचे पत्रकार करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रिन्स चार्ल्स यांनी महत्त्वाच्या कार्यक्रमात घेतलेला सहभाग हेच दाखवून देत असल्याचे ब्रिटनचे पत्रकार सांगत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर, प्रिन्स चार्ल्स यांनी मानवजातीच्या अस्तित्वाविषयी दिलेल्या भयावह इशार्‍यांचे महत्त्व वाढले आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info