‘नो डील ब्रेक्झिट’साठी ‘वॉर कॅबिनेट’सह एक अब्ज पौंडाची विशेष तरतूद – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन

लंडन – यशस्वी ‘ब्रेक्झिट’ हेच लक्ष्य असल्याचे जाहीर करणारे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यासाठी आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान जॉन्सन यांनी ‘ब्रेक्झिट’चे कट्टर समर्थक असलेल्या सहा वरिष्ठ मंत्र्यांचे ‘वॉर कॅबिनेट’ तयार केले असून हे कॅबिनेट ‘ब्रेक्झिट’बाबतचे महत्त्वाचे निर्णय घेणार आहे. त्याचवेळी ३१ ऑक्टोबर हीच ‘डेडलाईन’ धरून ब्रिटीश यंत्रणा सक्रिय झाल्या असून संपूर्ण प्रक्रियेसाठी एक अब्ज पौंडांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

‘वॉर कॅबिनेट’, नो डील ब्रेक्झिट, बोरिस जॉन्सन, ब्रेक्झिट, युरोपिय महासंघ, ब्रिटन, दुसरे महायुद्ध

‘३१ ऑक्टोबर किंवा त्यापूर्वी ब्रिटन युरोपिय महासंघातून बाहेर पडणार आहे. आपण सर्व त्यासाठी वचनबद्ध आहोत. यात कोणत्याही प्रकारे जर-तर, पण-परंतु आडवे येणार नाहीत’, अशा शब्दात ब्रिटनचे नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आपली प्राथमिकता स्पष्ट केली होती. त्याचवेळी ‘ब्रेक्झिट’ देशाच्या एकजुटीसाठी तसेच ब्रिटनला सर्वोत्तम बनविण्यासाठी आवश्यक असल्याचा दावाही केला होता. हीच भूमिका कायम ठेऊन पंतप्रधान जॉन्सन व ब्रिटनचे मंत्रिमंडळ तसेच इतर यंत्रणा सक्रिय झाल्याचे समोर येत आहे.

‘वॉर कॅबिनेट’, नो डील ब्रेक्झिट, बोरिस जॉन्सन, ब्रेक्झिट, युरोपिय महासंघ, ब्रिटन, दुसरे महायुद्धब्रेक्झिट’साठी स्थापन करण्यात आलेले ‘वॉर कॅबिनेट’ या जॉन्सन यांचा महत्त्वाचा निर्णय मानला जात असून यातून त्यांनी सरकारमधील समर्थक तसेच विरोधकांना इशारा दिल्याचे सांगण्यात येत आहे. या ‘वॉर कॅबिनेट’चे नेतृत्त्व ‘नो डील मिनिस्टर’ म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या मायकल गोव्ह यांच्याकडे देण्यात आले आहे. ३१ ऑक्टोबर किंवा त्यापूर्वी ब्रिटन युरोपिय महासंघातून बाहेर पडताना ‘नो डील’च्या पर्यायासहच बाहेर पडले, या अंदाजावर ‘वॉर कॅबिनेट’ची उभारणी करण्यात आली आहे.

‘वॉर कॅबिनेट’च्या उभारणीपाठोपाठ ‘नो डील ब्रेक्झिट’साठी विविध यंत्रणांना तब्बल एक अब्ज पौंडांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ब्रिटनचे अर्थमंत्री साजिद जाविद याबाबतचा कार्यक्रम जाहीर करतील, असे सांगण्यात येते.

‘ब्रेक्झिट’साठी दुसर्‍या महायुद्धानंतरची सर्वात मोठी प्रचार मोहीम

‘ब्रेक्झिट’साठी ब्रिटनच्या जनतेला मार्गदर्शन करण्यासाठी भव्य प्रचारमोहिमेचीही आखणी करण्यात आली आहे. ब्रिटीश माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार, दुसर्‍या महायुद्धाच्या काळात राबविण्यात आलेल्या मोहिमेनंतरची ही सर्वात मोठी प्रचारमोहीम ठरेल. या मोहिमेअंतर्गत ब्रिटनमधील सुमारे २.७ कोटी घरांमध्ये ‘ब्रेक्झिट’बाबतची संपूर्ण माहिती देणारी पुस्तिका देण्यात येईल. त्याचवेळी टीव्हीवर स्वतंत्र जाहिरात मोहीम राबवून सातत्याने ‘ब्रेक्झिट’ची माहिती देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. ही तयारी सुरू असतानाच ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनी, युरोपिय महासंघाने हटवादी भूमिका सोडावी अन्यथा ‘नो डील’चीच तयारी करावी, असा खरमरीत इशारा दिला आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info