अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’कडे जागतिक समीकरणे बदलणारे तंत्रज्ञान आहे – अमेरिकी वायुसेनेच्या माजी अधिकार्‍याचा दावा

अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’कडे जागतिक समीकरणे बदलणारे तंत्रज्ञान आहे – अमेरिकी वायुसेनेच्या माजी अधिकार्‍याचा दावा

लंडन – ‘‘अवघ्या तासात मानवाला पृथ्वीच्या एका कोपर्‍यातून दुसर्‍या कोपर्‍यापर्यंत घेऊन जाणे, मोबाईल टॉवरशिवाय अंतराळातून ‘वाय-फाय’ची सेवा पुरविणे, प्लग न करताही मोबाईल फोन चार्ज करणे व अतिरिक्त ऊर्जेचा साठा करून ठेवणे, असे जागतिक समीकरणे बदलणारे तीन अभूतपूर्व तंत्रज्ञान अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’ने विकसित केले आहे. ‘स्पेस फोर्स’ या तंत्रज्ञानाचा कधी वापर करणार, याची प्रतीक्षा आहे’’, असा दावा अमेरिकेच्या वायुसेनेचे माजी वरिष्ठ अधिकारी ‘जनरल स्टिव्हन वॅस्ट’ यांनी केला.

       ‘स्पेस फोर्स’, तंत्रज्ञान विकसित, स्टिव्हन वॅस्ट, अंतराळ युद्ध, लंडन, अमेरिका‘स्पेस फोर्स’, तंत्रज्ञान विकसित, स्टिव्हन वॅस्ट, अंतराळ युद्ध, लंडन, अमेरिकाअमेरिकी वायुसेनेचे माजी अधिकारी असलेल्या जनरल वॅस्ट यांनी नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये जनरल वॅस्ट यांनी अमेरिकेची ‘स्पेस फोर्स’ जागतिक समीकरणे बदलणारी असेल, असा दावा केला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या ‘स्पेस फोर्स’मुळे अंतराळ युद्धाची ठिणगी पडून तिसरे महायुद्ध पेट घेईल, असा इशारा काही विश्‍लेषक करीत आहेत. पण जनरल वॅस्ट यांनी हा दावा खोडून काढला.

‘स्पेस फोर्स’साठी अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेले तंत्रज्ञान नकारात्मक गोष्टींवर वरचढ ठरतील, असे जनरल वॅस्ट म्हणाले. अमेरिकेच्या वायुसेनेत ३३ वर्षे सेवा करताना काही शास्त्रज्ञांशी आपली मैत्री झाली. त्यावेळी अमेरिकेने असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे सर्व समीकरणे बदलून टाकतील, असे या शास्त्रज्ञांशी बोलताना आपल्याला जाणवले, अशी माहिती जनरल वॅस्ट यांनी दिली.

यापैकी तीन गोष्टींचा उल्लेख जनरल वॅस्ट यांनी केला. यामध्ये तासाभरात मानवाला पृथ्वीच्या एका कोपर्‍यापासून दुसर्‍या कोपर्‍यावर सोडणे, कुठल्याही टॉवरशिवाय अंतराळातून ‘वाय-फाय’ नेटवर्क पुरविणे आणि प्लगशिवाय फोन चार्ज करण्याचे तंत्रज्ञान अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. स्पेस फोर्स’साठी सदर तंत्रज्ञानाचा वापर होईल, असा दावा वॅस्ट यांनी केला.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रस्तावित केलेल्या ७३८ अब्ज डॉलर्सच्या संरक्षणखर्चाला अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने बुधवारी मंजुरी दिली. या संरक्षणखर्चामध्ये ‘स्पेस फोर्स’साठी ७२ अब्ज डॉलर्सची तरतूद केली आहे. यामुळे अमेरिकेच्या संरक्षणदलातील सहावी शाखा असणारी ‘स्पेस फोर्स’ लवकरच कार्यान्वित होईल, असा दावा केला जातो. पण काही लष्करी विश्‍लेषकांच्या मते, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची ‘स्पेस फोर्स’ याआधीच सक्रिय झाली आहे. ‘स्पेस फोर्स’च्या विमानांनी अंतराळात घिरट्याही सुरू केल्याचा दावा हे विश्‍लेषक करीत आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info