आयएस युरोपात दहशतवादी हल्ले चढविण्याच्या तयारीत – सुरक्षा यंत्रणांचा इशारा

आयएस युरोपात दहशतवादी हल्ले चढविण्याच्या तयारीत – सुरक्षा यंत्रणांचा इशारा

लंडन/माद्रिद – युरोपिय देश कोरोनाव्हायरसच्या साथीशी झगडत असतानाच दहशतवादी हल्ल्यांचा नवा धोका समोर आला आहे. ‘आयएस’ ही दहशतवादी संघटना साथीचा फायदा उचलून युरोपात एकांड्या दहशतवाद्यांचे हल्ले घडविण्याच्या तयारीत असल्याचा इशारा सुरक्षयंत्रणांनी दिला आहे. स्पेनमधील पोलिसांनी केलेल्या कारवाईतून ही माहिती उघड झाली. दोन आठवड्यांपूर्वी स्पेनच्या दहशतवादविरोधी पोलिस पथकाने ‘आयएस’च्या युरोपातील ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्यांपैकी एक ‘अब्देल-मजेद अब्देल बारी’ला अटक केली होती. अब्देल-मजेद हा आयएसमधील ब्रिटीश दहशतवादी ‘जिहादी जॉन’चा सहकारी होता, अशी माहिती स्पॅनिश यंत्रणांनी दिली. ब्रिटननेही या माहितीला दुजोरा दिला आहे. अब्देल-मजेद गेल्या महिन्यात अल्जिरियातून बोटीने स्पेनमध्ये घुसल्याचे उघड झाले आहे. त्यासाठी त्याने स्पेनमध्ये जाणाऱ्या आफ्रिकी निर्वासितांच्या गटाचा वापर केला असावा, असे मानले जाते. स्पेनमध्ये आल्यानंतर अब्देल-मजेदने कोरोनाच्या साथीमुळे सुरू असलेल्या लॉकडाउनचा गैरफायदा घेत आपली ओळख लपविण्यात यश मिळविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मात्र स्पेनच्या ‘नॅशनल पोलिसां’च्या दहशतवादविरोधी पथकाने अब्देल-मजेदला अटक करण्यात यश मिळवले आहे. मजेद च्या अटकेनंतर काही दिवसातच एका संशयित ‘आयएस’ दहशतवाद्यालाही ताब्यात घेण्यात आले. हा संशयित मोरोक्कन नागरिक असून त्याला बार्सिलोना शहरातील कारवाईत पकडण्यात आल्याचे स्पॅनिश यंत्रणांनी सांगितले. एकामागोमाग झालेल्या कारवाईत दोन ‘आयएस’ दहशतवादी सापडल्यानंतर आयएसकडून हल्ल्यांची तयारी सुरू असल्याचे उघड झाले आहे. बार्सिलोनात झालेल्या कारवाईत संशयित दहशतवाद्याने हल्ल्यासाठी ‘टार्गेट’ शोधत असल्याची कबुली दिल्याचा दावा स्पॅनिश यंत्रणांकडून करण्यात आला.

गेल्या काही वर्षांत युरोपात मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले झाले असून त्यामागे ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे उघड झाले आहे. ‘आयएस’ने युरोपात जाणाऱ्या निर्वासितांच्या लोंढ्याचा फायदा उचलून हजारो दहशतवादी घुसवण्यात यश मिळवले आहे. मात्र त्यानंतरही युरोपिय यंत्रणा निर्वासितांची घुसखोरी गांभीर्याने घेत नसल्याचे अब्देल-मजेदच्या स्पेनमधील अटकेनंतर स्पष्ट झाले आहे.

युरोपात कोरोना साथीचा जबरदस्त फटका बसलेल्या देशांमध्ये ब्रिटन, इटली, जर्मनी, फ्रान्स, बेल्जियमबरोबरच स्पेनचाही समावेश आहे. साथ रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे या देशातील सुरक्षयंत्रणा आधीच तणावाखाली असल्याचे सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर ‘आयएस’चे हल्ले झाल्यास युरोपिय देशांसमोरील आव्हान अधिकच तीव्र होईल, असे संकेत मिळत आहेत.

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info