अफगाणिस्तानमध्ये आठवड्याभरातील तालिबानच्या हल्ल्यात ४०० अफगाणी जवानांचा बळी

अफगाणिस्तानमध्ये आठवड्याभरातील तालिबानच्या हल्ल्यात ४०० अफगाणी जवानांचा बळी

काबूल- गेल्या आठवड्याभरात तालिबानने अफगाणिस्तानच्या सुरक्षादलांवर २२२ हल्ले चढवून ४०० हून अधिक जणांचा बळी घेतला आहे. अफगाणिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयानेच ही माहिती प्रसिद्ध केली. त्याचवेळी रविवारी रात्री अफगाणी सुरक्षा दल आणि तालिबानमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. तसेच अफगाणी सरकार आणि तालिबानमध्ये चर्चा सुरु होणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

अफगाणिस्तान, दहशतवादी हल्ला, तालिबान

२४ मे रोजी ईदच्या पार्श्वभूमीवर तालिबानने संघर्षबंदी जाहीर केली होती. ही संघर्षबंदी मागे घेतल्यानंतर तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानमध्ये हल्ले चढविले. गेल्या आठवड्याभरात या हल्ल्यांची तीव्रता वाढली, असे अफगाणिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने म्हटले. शनिवारी अफगाणिस्तानमध्ये झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यात १८ जणांचा बळी गेला. तर त्या आधी अफगाणिस्तानच्या प्रार्थनास्थळाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात ४ जणांचा बळी गेला. या सर्व हल्ल्यांना तालिबानच जबाबदार असल्याचा आरोप अफगाणिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने केला.

तसेच गेल्या आठवड्याभरात तालिबानने अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांवर २२२ हल्ले चढविले असून यात ४०० हून अधिक सुरक्षा दलांच्या जवानांचा बळी गेल्याचे अफगाणी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने स्पष्ट केले. अद्याप यावर तालिबानची प्रतिक्रिया आली नाही. त्याचवेळी अफगाणी सरकार आणि तालिबानमध्ये चर्चा होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. या चर्चेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. पण अफगाणिस्तानात सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अफगाणी सरकार व तालिबानमधील चर्चा कितपत यशस्वी ठरेल, असे प्रश्न आतापासूनच पडू लागले आहेत. तालिबानने अफगाणी सुरक्षा दलांवरील हल्ले थांबविले नाही तर अमेरिका तालिबानबरोबरील शांतीकरारावर फेरविचार करील असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी तालिबानच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढवून अमेरिकेने या संघटनेला खरमरीत इशारा दिला होता.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info