Breaking News

इथिओपियातील वांशिक हत्याकांडात २००हून अधिक जणांचा बळी

वांशिक हत्याकांड, निर्घृण हल्ला, बेनिशंगुल-गुमुझ, हत्याकांड, घुसखोरी, इथिओपिया, तिगरे, TWW, Third World War

आदिस अबाबा – इथिओपियाच्या गुमूझ प्रांतात घडविण्यात आलेल्या वांशिक हत्याकांडात २००हून अधिक जणांचा बळी गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. बुधवारी पहाटे ‘बेकोजी’ गावातील नागरिक झोपेत असतानाच सशस्त्र टोळ्यांनी निर्घृण हल्ला चढविल्याची माहिती स्थानिक मानवाधिकार आयोगाने दिली. या हत्याकांडानंतर लष्कराने केलेल्या कारवाईत ४०हून अधिक हल्लेखोर ठार झाल्याची माहिती सरकारी वृत्तवाहिनीने दिली आहे.

वांशिक हत्याकांड, निर्घृण हल्ला, बेनिशंगुल-गुमुझ, हत्याकांड, घुसखोरी, इथिओपिया, तिगरे, TWW, Third World War

बेनिशंगुल-गुमुझ प्रांतात गेल्या चार महिन्यात झालेला हा चौथा मोठा हल्ला ठरला आहे. इथिओपियाचे पंतप्रधान अबि अहमद यांनी मंगळवारीच बेनिशंगुल-गुमुझ प्रांताला भेट दिली होती. या भेटीत यापूर्वी झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख करून त्यांना जबाबदार असणार्‍यांना शिक्षा व्हायला हवी, अशा स्वरुपाचे वक्तव्य केले होते. त्याला २४ तास उलटण्यापूर्वीच हा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. पंतप्रधान अहमद यांनी या हत्याकांडावर तीव्र शोक व्यक्त करून त्या भागात अतिरिक्त लष्कर तैनात करण्याची घोषणा केली आहे.

वांशिक हत्याकांड, निर्घृण हल्ला, बेनिशंगुल-गुमुझ, हत्याकांड, घुसखोरी, इथिओपिया, तिगरे, TWW, Third World War

सरकारचा भाग असणार्‍या ‘नॅशनल मुव्हमेंट ऑफ अम्हारा’ या पक्षाने हल्ल्यामागे ‘गुमूझ मिलिशिया’चा हात असल्याचा आरोप केला आहे. इथिओपियात ८०हून अधिक वांशिक गट असून ‘ओरोमो’ व ‘अम्हारा’ त्यातील प्रमुख गट मानले जातात. बेनिशंगुल-गुमुझ हा प्रांत ‘अम्हारा’ वंशियाचे प्राबल्य असलेल्या प्रांताला जोडलेला आहे. गेल्या काही वर्षात अम्हारावंशियांनी बेनिशंगुल-गुमुझ प्रांतात घुसखोरी सुरू केल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या घुसखोरीला स्थानिक ‘गुमूझ’वंशियांचा विरोध असून त्यातून हल्ल्यांचे सत्र सुरू झाले असावे, असे सांगण्यात येते.

वांशिक हत्याकांड, निर्घृण हल्ला, बेनिशंगुल-गुमुझ, हत्याकांड, घुसखोरी, इथिओपिया, तिगरे, TWW, Third World War

बुधवारी झालेले हत्याकांड गेल्या चार महिन्यातील सर्वात मोठी दुर्घटना ठरली आहे. यापूर्वी सप्टेंबर तसेच ऑक्टोबर महिन्यात झालेल्या हल्ल्यांमध्ये अनुक्रमे १५ व १४ जणांचा बळी गेला होता. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या हल्ल्यात ५४ हून अधिक जण मारले गेले होते. हा हल्ला तिगरे प्रांतातून झाल्याचे समोर आले होते. इथिओपियातील हे वाढते हल्ले सध्याच्या तणावात अधिकच भर टाकणारे ठरले आहेत. गेल्या महिन्यात पंतप्रधान अबि अहमद यांनी तिगरे प्रांतातील बंडखोरांविरोधात निर्णायक लष्करी कारवाई हाती घेतली होती. त्याला यश मिळाल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला असला तरी तिगरेतील हिंसाचार अद्यापही थांबलेला नाही. तिगरेतील हिंसाचारामुळे हजारो नागरिक शेजारी देश सुदानमध्ये स्थलांतरित झाले असून, सुदानने पंतप्रधान अहमद यांच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान अबि अहमद यांना इरिट्रियाबरोबरील संघर्ष थांबविल्याबद्दल नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मात्र त्यानंतर देशातील अंतर्गत तणाव व हिंसाचारावर मार्ग काढण्यात पंतप्रधान अहमद पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र समोर आले आहे. शेजारी देशांबरोबर शांतता प्रस्थापित करणारे पंतप्रधान देशातील वांशिक संघर्ष मिटवू शकलेले नाहीत. त्यामुळे आफ्रिकेतील दुसर्‍या क्रमांकाचा मोठा देश ही ओळख असलेल्या इथिओपियात हिंसा व अस्थैर्याचे सत्र कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info