चीन-ऑस्ट्रेलिया व्यापारयुद्धात ‘फाईव्ह आईज अलायन्स’कडून चीनला प्रत्युत्तर देण्याच्या हालचाली

चीन-ऑस्ट्रेलिया व्यापारयुद्धात ‘फाईव्ह आईज अलायन्स’कडून चीनला प्रत्युत्तर देण्याच्या हालचाली

कॅनबेरा/बीजिंग – गेल्या काही महिन्यांपासून चीनने ऑस्ट्रेलियाविरोधात छेडलेल्या व्यापारयुद्धात चीनला मोठा फटका बसण्याचे संकेत मिळत आहेत. जगातील आघाडीच्या गटांपैकी एक असणाऱ्या ‘फाईव्ह आईज अलायन्स’ने या व्यापारयुद्धात चीनला प्रत्युत्तर देण्याच्या हालचाली सुरू केल्याचा दावा ऑस्ट्रेलियन विश्‍लेषकांनी केला आहे. या मोहिमेत जपानही सहभागी होऊ शकतो, असेही सांगण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणांचा गट ही ओळख असणाऱ्या ‘फाईव्ह आईज अलायन्स’मध्ये ऑस्ट्रेलियासह अमेरिका, कॅनडा, ब्रिटन व न्यूझीलंडचा समावेश आहे.

व्यापारयुद्धात, प्रत्युत्तर देण्याच्या हालचाली, फाईव्ह आईज अलायन्स, गुप्तचर यंत्रणांचा गट, कायदेशीर कारवाई, ऑस्ट्रेलिया, चीन, कोरोनाची साथ, TWW, Third World War

गेल्या काही वर्षांमध्ये चीनची सत्ताधारी राजवट ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप करीत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. चीनच्या वाढत्या प्रभावाचे परिणाम समोर आल्यानंतर ऑस्ट्रेलिया सरकारने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेऊन थेट कायदेशीर कारवाई हाती घेतली होती. ही कारवाई सुरू असतानाच कोरोना साथीमागे चीन सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त करून ऑस्ट्रेलियाने चौकशीची मागणी केली. ऑस्ट्रेलियाच्या या भूमिकेने बिथरलेल्या चीनने आर्थिक परिणामांची धमकी देण्यास सुरुवात केली होती. मात्र त्याकडेही ऑस्ट्रेलियाने दुर्लक्ष केल्यानंतर चीनने छुप्या रितीने व्यापारयुद्धास सुरुवात केली.

मे महिन्यात चीनने ऑस्ट्रेलियातून आयात करण्यात येणाऱ्या बार्लीवर तब्बल 80 टक्के कर लादला. त्यानंतर चीनच्या राजवटीने आपल्या नागरिकांना पर्यटन तसेच शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात जाणे टाळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर गेल्या दोन महिन्यात ऑस्ट्रेलियातून आयात होणारे मासे, सागरी उत्पादने, कापूस, मांस, कोळसा व वाईन यांच्यावर मोठ्या प्रमाणात आयात कर लादण्यात आले आहेत. हे कर लादतानाच ऑस्ट्रेलियातून चीनच्या बंदरांमध्ये दाखल झालेली उत्पादने अनेक दिवसांपासून रोखूनही धरण्यात आली आहेत. या सर्व कारवाईबाबत उघड स्पष्टीकरण अथवा खुलासा देण्याचेही चीनकडून टाळण्यात आले आहे.

व्यापारयुद्धात, प्रत्युत्तर देण्याच्या हालचाली, फाईव्ह आईज अलायन्स, गुप्तचर यंत्रणांचा गट, कायदेशीर कारवाई, ऑस्ट्रेलिया, चीन, कोरोनाची साथ, TWW, Third World War

या पार्श्‍वभूमीवर आता ऑस्ट्रेलियाने आपल्या प्रमुख सहकारी देशांच्या सहकार्याने चीनविरोधात आक्रमक धोरण राबविण्याचे संकेत दिले आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणांनी एकत्र येऊन सहकार्य वाढविण्यासंदर्भात करार केला होता. त्यानंतर या आघाडीत कॅनडा, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडचा समावेश करण्यात आला होता. अमेरिका व रशिया मधील शीतयुद्धाच्या काळात ही आघाडी अधिक भक्कम करण्यासाठी पावले उचलण्यात आली होती. शीतयुद्ध संपल्यानंतरही हा गट कार्यरत असला तरी त्याच्या हालचालींची व्याप्ती काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र गेल्या काही वर्षात चीनविरोधातील विविध मुद्यांवर ‘फाईव्ह आईज अलायन्स’ एकत्र येऊन आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. हुवेई, कोरोनाची साथ तसेच हाँगकाँगच्या मुद्यावर या गटाने चीनला उघड आव्हान दिल्याचे समोर आले आहे.

चीनने ऑस्ट्रेलियाविरोधात छेडलेल्या व्यापारयुद्धात ‘फाईव्ह आईज अलायन्स’ सहभागी झाल्यास चीनला त्याचा मोठा फटका बसू शकतो. या गटाचा सदस्य असलेल्या अमेरिकेने यापूर्वीच चीनविरोधात व्यापारयुद्ध छेडले असून त्याचे चीनच्या अर्थव्यवस्थेवर मोठे परिणाम दिसून आले आहेत. ब्रिटन, कॅनडा व न्यूझीलंडनेही ऑस्ट्रेलियाच्या समर्थनार्थ कारवाई केल्यास चीनचे इरादे धुळीला मिळू शकतात, असा दावा ऑस्ट्रेलियन विश्‍लेषक करीत आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info