अमेरिका लष्करी वाहतुकीसाठी रॉकेटचा वापर करण्याच्या तयारीत

अमेरिका लष्करी वाहतुकीसाठी रॉकेटचा वापर करण्याच्या तयारीत

रॉकेटचा वापर

वॉशिंग्टन – येत्या काळात अमेरिकन लष्कराची मालवाहतूक भल्या मोठ्या रॉकेटच्या सहाय्याने केली जाऊ शकते. या योजनेवर अमेरिका काम करीत आहे. यासाठी अंतराळ मोहिमांमध्ये वापरण्यात येणार्‍या ‘रियुजेबल’ रॉकेटच्या पर्यायाचा विचार सुरू असल्याची घोषणा अमेरिकी हवाईदलाने केली. याद्वारे अवघ्या एका तासात 100 टन वजनाचे साहित्य जगातील कुठल्याही ठिकाणी वाहून नेले जाईल, अशी माहिती अमेरिकेच्या हवाईदलाने दिली आहे.

अमेरिका लष्करी वाहतुकीसाठी रॉकेटचा वापर करण्याच्या तयारीतअमेरिकेच्या हवाईदलाने गेल्या आठवड्यात ‘2030 सायन्स अँड टेक्नोलॉजी स्ट्रॅटेजी’ अंतर्गत व्हेंगार्ड योजनेची घोषणा केली. अमेरिकेच्या स्पेस फोर्सच्या नेतृत्वाखाली ही योजना राबविण्यात येईल. यानुसार, भविष्यातील लष्करी मालवाहतुकीसाठी सुरक्षित आणि कमी खार्चिक पर्यायाचा वापर करण्यावर अभ्यास सुरू आहे. यासाठी रॉकेट कार्गो अर्थात रॉकेटच्या सहाय्याने मालवाहतूक करण्याच्या पर्यायाची घोषणा अमेरिकेच्या हवाईदलाने केली. अमेरिकन अंतराळ क्षेत्रात काम करणार्‍या ‘स्पेसएक्स’ कंपनीच्या स्टारशिप रियुजेबल रॉकेटचा पर्याय उत्तम ठरू शकतो, असे हवाईदलाने स्पष्ट केले.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/us-ready-to-use-spacex-like-private-rockets-for-military-cargo-transport/