वॉशिंग्टन/ब्रुसेल्स/मिन्स्क – बेलारुसमध्ये विमान अपहरण करून रोमन प्रोटासेविक या पत्रकाराला झालेल्या अटकेच्या मुद्यावर पाश्चात्य देशांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवारी अमेरिका, कॅनडा, ब्रिटन व युरोपिय महासंघाने संयुक्त निवेदन जारी करून बेलारुसवर कठोर निर्बंध लादत असल्याचे जाहीर केले. या निर्बंधांमध्ये बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या मुलासह वरिष्ठ नेते, अधिकारी तसेच कंपन्यांचा समावेश आहे. नव्या निर्बंधांमुळे बेलारुसच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका बसेल, असा दावा युरोपिय महासंघाने केला आहे.
गेल्या महिन्यात, ग्रीसमधून लिथुआनियासाठी निघालेले ‘रायनएअर’ कंपनीचे विमान हायजॅक करून जबरदस्तीने बेलारुसच्या मिन्स्क विमानतळावर उतरविण्यात आले होते. विमानातून प्रवास करणार्या रोमन प्रोटासेविक या पत्रकाराला तसेच त्यांची सहकारी सोफिआ सॅपेगालाही बेलारुसच्या यंत्रणांनी ताब्यात घेतले होते. रोमन प्रोटासेविकला नंतर थेट तुरुंगात धाडून त्याच्याकडून जबरदस्तीने कबुलीजबाबही घेण्यात आल्याचे समोर आले आहे. विरोध करणार्या पत्रकाराला ताब्यात घेण्यासाठी विमानाच अपहरण करण्याच्या या घटनेवर पाश्चात्य वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.
Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/strict-sanctions-on-belarus-by-eu-us-canada-and-uk/