अमेरिकेला इराण, इराक व सिरियाचे तुकडे करायचे आहेत – इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याचा आरोप

सिरियाचे तुकडे

तेहरान – ‘अमेरिकेला इराण, इराक आणि सिरियाचे तुकडे करून या क्षेत्रावर आपले नियंत्रण प्रस्थापित करायचे आहे. पण इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या नेतृत्वामुळे अमेरिका आपल्या उद्दिष्टांमध्ये अपयशी ठरली आहे’, असा आरोप इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी ब्रिगेडिअर जनरल आमिर अली हाजिझादेह यांनी केला. त्याचबरोबर इराण कासेम सुलेमानी यांची हत्या कधीही विसरली जाणार नाही व त्याचा नक्की सूड घेतला जाईल, अशी धमकी हाजिझादेह यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून इराण, इराक आणि सिरियातील अमेरिकाविरोध तीव्र होऊ लागला आहे. या तीनही देशांमधील इराणसंलग्न गट इराक व सिरियातील अमेरिकेच्या सैन्यमाघारीची मागणी करीत आहेत. अमेरिकेच्या लष्कराने आमच्या देशातून चालते व्हावे, अशी मागणी इराकमधील काही इराणसंलग्न राजकीय नेत्यांनी केली. तर इराणच्या संसदेतही याचे पडसाद उमटले. इराक व इराणमधील या अमेरिकाविरोधी मोहिमेमागे इराणची रिव्होल्युशनरी गार्ड्स असल्याचा दावा केला जातो.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/us-wants-to-disintegrate-iran-iraq-and-syria/