उघुरांचा वंशसंहार करणार्‍या चीनच्या हिवाळी ऑलिंपिकवर ब्रिटनने बहिष्कार टाकावा – ब्रिटनच्या संसद समितीची मागणी

हिवाळी ऑलिंपिकवर बहिष्कार

लंडन – ‘झिंजियांग प्रांतात उघुरांचा वंशसंहार करणार्‍या चीनला अद्दल घडविण्यासाठी ब्रिटनने पुढच्या वर्षी बीजिंगमध्ये होणार्‍या हिवाळी ऑलिंपिकवर बहिष्कार टाकावा. झिंजियांग प्रांतातील चिनी उत्पादनांच्या खरेदीवर बंदी घालावी’, अशी मागणी ब्रिटनच्या संसदीय समितीने केली. उघुरांच्या मानवाधिकारांप्रकरणी चीनला जबाबदार धरण्याची हीच वेळ असल्याचे आवाहन या समितीने आपल्या अहवालातून केले आहे. अमेरिकेचे लोकप्रतिनिधी देखील बायडेन प्रशासनाकडे अशीच मागणी करीत आहेत.

ब्रिटनच्या संसदेतील परराष्ट्र धोरणविषयक समितीने गुरुवारी सादर केलेल्या अहवालात पंतप्रधान बोरिस जॉनसन आणि त्यांच्या सहकार्‍यांकडे चीनविरोधात कठोर भूमिका घेण्याचे मागणी केली. ‘एखाद्या मोठ्या अत्याचार आणि शोकांतिकेनंतर, पुन्हा असे कधी घडू देणार नाही, असे जगाचे म्हणणे असते. पण हे अत्याचार यापुढेही सुरूच राहतात. अजूनही चीन उघुरांवर करीत असलेल्या अत्याचारांवर कारवाई करण्याची वेळ गेलेली नाही’, असे आवाहन या अहवालात केले आहे.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/uk-should-boycott-china-winter-olympics-over-genocide/