अमेरिका-ऑस्ट्रेलियातील युद्धसरावावर नजर ठेवण्यासाठी चीनचे हेरगिरी जहाज रवाना

हेरगिरी

सिडनी – अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या युद्धसरावामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने यावर नजर ठेवण्यासाठी आपले हेरगिरी जहाज रवाना केले आहे. याआधी चीनने अमेरिका-ऑस्ट्रेलियातील सरावावर हेरगिरी केल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण पहिल्यांदाच हेरगिरीसाठी दोन जहाजे रवाना करून चीनने सदर युद्धसरावाबाबत असलेली बेचैनी दाखवून दिली. दरम्यान, अमेरिकेच्या लष्कराने देखील या सरावात पॅट्रियॉट क्षेपणास्त्र यंत्रणेची यशस्वी चाचणी घेतली.

अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील ‘तालिस्मान सॅबर’ हा द्वैवार्षिक युद्धसराव आहे. साधारण महिनाभर चालणार्‍या या सरावात दोन्ही देशांची मरिन्स मोठ्या संख्येने सहभागी होतात. यंदाच्या सरावात अमेरिकेच्या पॅसिफिक कमांडचे हवाईदल तसेच मिसाईल डिफेन्स युनिस्ट सहभागी झाले आहेत. गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या या सरावावर नजर ठेवण्यासाठी चीनने आपले हेरगिरी जहाज रवाना केल्याची बातमी याआधी प्रसिद्ध झाली होती. पण चीनचे आणखी एक हेरगिरी जहाज पापुआ न्यू गिनी बेटदेशाजवळ पोहोचले आहे.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/chinese-spy-ship-dispatched-to-monitor-us-australia-war-games/