अमेरिकेच्या माजी व्यापारमंत्र्यांसह सहा अधिकार्‍यांवर चीनचे निर्बंध

निर्बंध

बीजिंग – अमेरिकेने हाँगकाँग मुद्यावरून चीनवर लादलेल्या निर्बंधांना प्रत्युत्तर देत चीनने अमेरिकेच्या माजी मंत्र्यांसह सहा अधिकार्‍यांवर निर्बंधांची घोषणा केली आहे. सहा अधिकार्‍यांव्यतिरिक्त ‘हाँगकाँग डेमोक्रसी कौन्सिल’ या अभ्यासगटालाही लक्ष्य करण्यात आले आहे. चीनच्या निर्बंधांमुळे अमेरिकेचे धोरण व निश्‍चय बदलणार नाही, अशी प्रतिक्रिया व्हाईट हाऊसच्या प्रतिक्रिया जेन साकी यांनी दिली. चीनने वर्षभरात अमेरिकी अधिकारी व नेत्यांविरोधात निर्बंध लादण्याची ही तिसरी वेळ आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेने हाँगकाँगच्या मुद्यावरून अमेरिकी कंपन्यांना धोक्याचा इशारा दिला होता. त्याचवेळी हाँगकाँगमधील अनेक चिनी अधिकार्‍यांवर निर्बंधांचीही घोषणा केली होती. चीनने शुक्रवारी जाहीर केलेले निर्बंध अमेरिकेच्या या कारवाईला प्रत्युत्तर असल्याचे सांगण्यात येते. ‘अमेरिकेची कारवाई चुकीची असून चीनने त्याला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशी प्रतिबंधविरोधी कायद्यानुसार अमेरिकेच्या सात अधिकारी व गटांवर निर्बंध लादण्यात येत आहेत’, असे चीनच्या परराष्ट्र विभागाकडून सांगण्यात आले.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/china-imposes-sanctions-on-six-officials-including-former-us-secretary-of-commerce/