ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांकडून डिजिटल करन्सी ‘ब्रिटकॉईन’चे संकेत

‘ब्रिटकॉईन’

लंडन – ब्रिटनचे अर्थमंत्री ॠषि सुनक यांनी ‘ब्रिटकॉईन’ नावाने डिजिटल करन्सी सुरू करण्याचे संकेत दिले. यासंदर्भात ब्रिटनचा अर्थ विभाग व मध्यवर्ती बँक ‘बँक ऑफ इंग्लंड’ने काही महिन्यांपूर्वी स्वतंत्र टास्कफोर्सही स्थापन केले आहे. कोरोना व ‘ब्रेक्झिट’च्या पार्श्‍वभूमीवर ब्रिटीश अर्थव्यवस्था संकटात येण्याची शक्यता असून, डिजिटल करन्सी अर्थव्यवस्थेला गती देऊ शकते असा दावा केला जातो. चीनमध्ये सध्या प्रायोगिक पातळीवर ‘डिजिटल युआन’ची अंमलबजावणी सुरू असून, गेल्याच महिन्यात सिंगापूरनेही ‘डिजिटल करन्सी’ विकसित करण्याचे संकेत दिले होते.

डिजिटल करन्सी ‘ब्रिटकॉईन’ हे ब्रिटीश चलन पौंडची डिजिटल आवृत्ती असेल. ‘ब्रिटकॉईन’चा प्रवेश ब्रिटनच्या अर्थ व वित्तक्षेत्रातील मोठा बदल ठरु शकतो, असा दावा अर्थ विभागातील अंतर्गत सूत्रांनी केला. ‘डिजिटल करन्सी’वर ब्रिटनची मध्यवर्ती बँक असणार्‍या ‘बँक ऑफ इंग्लंड’चेच नियंत्रण असणे महत्त्वाची बाब ठरते, याकडेही लक्ष वेधण्यात येत आहे.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/indications-of-digital-currency-britcoin-from-the-uk-finance-minister/