मध्य आशियाई देशांमध्ये चीन आपल्या ‘प्रायव्हेट आर्मी’चा विस्तार करणार

‘प्रायव्हेट आर्मी’

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्यमाघारीमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी चीनने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. अफगाणिस्तानात वर्चस्व प्रस्थापित करून त्याद्वारे मध्य आशियाई देशांमध्ये प्रभाव टाकण्यासाठी चीनने महत्त्वाचा निर्णय घेतला. मध्य आशियाई देशांमध्ये चीन आपल्या ‘प्रायव्हेट आर्मी’चा अर्थात कंत्राटी लष्कराचा विस्तार करणार आहे.

गेल्या आठवड्यात मध्य आशियाई देशांच्या दौर्‍यावर असणार्‍या चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी ही घोषणा केली. मध्य आशियाई देशांमध्ये चीन करीत असलेला खाजगी लष्कराचा विस्तार रशियाच्या सुरक्षेसाठी सर्वात मोठे आव्हान ठरेल, असा दावा प्रसिद्ध अमेरिकी अभ्यासगटाने केला आहे.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/china-will-expand-its-private-army-in-central-asian-countries/