जेरूसलेम – दोन महिन्यांपूर्वी गाझातील हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर चार हजारांहून अधिक रॉकेट हल्ले चढविले. ‘आयर्न डोम’ या हवाई सुरक्षा यंत्रणेच्या सहाय्याने 90 टक्के रॉकेट हल्ले यशस्वीरित्या भेदल्याचे इस्रायली लष्कराने जाहीर केले. पण आयर्न डोमपेक्षाही भेदक आणि अचूक मारा करणारी ‘लेझर डोम’ विकसित करण्यासाठी इस्रायल व अमेरिका एकत्र आली आहे. शस्त्रनिर्मितीत आघाडीवर असलेल्या अमेरिकेच्या कंपनीने ही माहिती उघड केली.
सध्या इस्रायलचे संरक्षणदल ‘अॅरो-2’, ‘अॅरो-3’, ‘डेव्हिड्ज् स्लिंग’ आणि ‘आयर्न डोम’ या चार स्वदेशी बनावटीच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने सज्ज आहे. तर इस्रायलच्या ‘राफेल अॅडव्हान्स्ड् डिफेन्स सिस्टिम’ या कंपनीने तयार केलेली ‘आयर्न बिम’ ही लेझर यंत्रणा देखील इस्रायली लष्कराच्या ताफ्यात आहे. आयर्न डोमप्रमाणे लघुपल्ल्याचे रॉकेट्स, मॉर्टर बॉम्बचे हल्ले भेदण्यासाठी आयर्न बिमचा वापर होऊ शकतो व ही यंत्रणा आयर्न डोमपेक्षाही भेदक असल्याचे बोलल जाते.
Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/israeli-and-american-companies-will-develop-a-laser-dome/