कोरोना, पोलिसांची कमतरता व वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेत बंदुकांच्या विक्रीत प्रचंड वाढ – सहा महिन्यात दोन कोटींहून अधिक बंदुकांची विक्री

बंदुकांची विक्री

वॉशिंग्टन – अमेरिकेत यावर्षी पहिल्या सहा महिन्यात दोन कोटींहून अधिक बंदुकांची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 15 टक्क्यांहून अधिक असल्याचे सांगण्यात येते. कोरोनाच्या साथीचा फैलाव, पोलिसांची कमतरता व वाढत्या हिंसाचारामुळे बंदुकांची विक्री वाढत असून, त्यासाठी लागणार्‍या गोळ्यांची कमतरता भासू लागल्याचे दावे विक्रेत्यांकडून करण्यात येत आहेत.

अमेरिकी तपासयंत्रणा ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’(एफबीआय) व ‘नॅशनल रायफल्स असोसिएशन’(एनआरए) यांनी दिलेल्या माहितीतून बंदुकांच्या वाढत्या विक्रीचा ‘ट्रेंड’ समोर आला आहे. 2020 साली अमेरिकेत एकूण तीन कोटी 97 लाख बंदुकांची विक्री झाल्याचे सांगण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या विक्रीमागे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक, राजकीय स्तरावरील असंतोष, कोरोनामुळे जाहीर झालेले लॉकडाऊन व अनिश्‍चितता यासारखे घटक असल्याचे सांगण्यात आले होते.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/corona-gun-shortage-in-the-united-states-on-the-back-of-a-lack-of-police-and-growing-violence/