लेबेनॉनमधून इस्रायलवर रॉकेट हल्ले – इस्रायलकडून प्रत्युत्तर

इस्रायलवर रॉकेट हल्ले

तेल अविव – बुधवारी दुपारी लेबेनॉनमधून इस्रायलवर तीन रॉकेट हल्ले झाले. या हल्ल्यात इस्रायलची जीवितहानी झाली नाही. पण इस्रायली लष्कराने लेबेनॉनच्या दक्षिणभागात तोफगोळे डागून या हल्ल्यांना उत्तर दिले. लेबेनॉनमधून झालेल्या या हल्ल्यांमागे इराणसंलग्न दहशतवादी संघटना असल्याचा संशय व्यक्त केला जातो.

इस्रायली माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, लेबेनॉनच्या हद्दीतून रॉकेटचा मारा झाला. यापैकी एक रॉकेट लेबेनॉनमध्येच कोसळले. तर दोन रॉकेट्स इस्रायलच्या किरयात श्मोना शहरातील क्फार गिलादी आणि तेल हाई येथील मोकळ्या मैदानात कोसळले. या रॉकेट हल्ल्यांबरोबर किरयात श्मोना शहरातील सायरन वाजून स्थानिकांना अलर्टचा संदेश देण्यात आला. त्यामुळे काही काळ इस्रायलच्या उत्तरेकडील भागात तणाव निर्माण झाला होता.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/rocket-attacks-on-israel-from-lebanon/