चीनच्या ‘फ्रँकनव्हायरस एक्सपरिमेंट’ने जगभरात नवी साथ फैलावण्याचा धोका

ऑस्ट्रेलियन पत्रकार व लेखिका शॅरी मार्क्सनचा यांचा इशारा

कॅनबेरा/बीजिंग – चीनच्या लॅब्ज्मध्ये सुरू असलेल्या ‘फ्रँकनव्हायरस’ प्रकारातील प्रयोगांमुळे जगात नव्या साथीची सुरुवात होऊ शकते, असा गंभीर इशारा ऑस्ट्रेलियन पत्रकार व लेखक शॅरी मार्क्सन यांनी दिला आहे. शॅरी मार्क्सन यांनी, कोरोना साथीमागे चीनमधील वुहान लॅबच कारणीभूत आहे याचे विस्तृत वर्णन करणारे पुस्तक लिहिले असून ते नुकतेच प्रकाशित झाले आहे. मार्क्सन यांनी एका मुलाखतीदरम्यान, नव्या साथीचा इशारा देतानाच कोणत्याही परिस्थितीत वुहान लॅबच्या रहस्याचा छडा लावायलाच हवा, अशी मागणीही केली आहे.

फ्रँकनव्हायरस

ऑस्ट्रेलियात शोधपत्रकार म्हणून कार्यरत असणार्‍या शॅरी मार्क्सन यांचे ‘व्हॉट रिअली हॅप्पन्ड् इन वुहान’ नावाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. यात त्यांनी कोरोनाची साथ ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’मधूनच सुरू झाल्याचे ठासून सांगितले आहे. कोरोनाच्या विषाणूत असलेले ‘जेनेटिक क्ल्यूज’, लॅबमध्ये व परिसरातील संशयास्द हालचाली आणि साथीसंदर्भातील माहिती दडपण्यासाठी चीनने आंतरराष्ट्रीय स्तरावर चालवलेली मोहीम हे सर्व घटक साथ वुहान लॅबमधूनच आल्याचे सिद्ध करतात, असा दावा मार्क्सन यांनी पुस्तकात केला आहे.

‘वुहान लॅबच्यासंदर्भात समोर आलेले सर्व पुरावे ठोस माहिती पुरविणारे आहेत. सर्व पुरावे एकत्र आणल्यावर वुहान लॅबमध्ये काहीतरी विचित्र घडले आहे, यात कोणतीही शंका उरत नाही. चीनची राजवट ते दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कोरोनाच्या साथीने केवळ ४७ लाख जणांचा बळी घेतला आहे, असे नाही तर आपल्या सर्वांचे आयुष्य उलटेपालटे करुन टाकले आहे. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, उद्योगधंदे बुडाले आणि मुलांच्या शाळाही बंद झाल्या’, अशा शब्दात शॅरी मार्क्सन यांनी चीनला लक्ष्य केले.

चीनची वुहान लॅब ही कोरोनाव्हायरसचे संशोधन करणारी आघाडीची प्रयोगशाळा होती, याकडे मार्क्सन यांनी लक्ष वेधले. मात्र त्याचा दर्जा ब्रिटन व अमेरिकेतील प्रयोगशाळांप्रमाणे नव्हता आणि त्यावर आवश्यक ती देखरेखही नव्हती, असा दावा ऑस्ट्रेलियन लेखिकेने केला आहे. वुहानच्या लॅबमध्ये धोकादायक जैविक संशोधन सुरू होते आणि नवी साथ रोखायची असेल तर तिथे नक्की काय चालले आहे, याची संपूर्ण माहिती जगासमोर येणे आवश्यक आहे, असेही मार्क्सन पुढे म्हणाल्या. मात्र चीन ही माहिती कधीच जगासमोर येऊ देणार नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

फ्रँकनव्हायरस

२०१९ साली कोरोनाव्हायरसची सुरुवात झाल्यापासून चीनची याबाबतची भूमिक संशयास्पद राहिली आहे. आपल्यावर ठेवण्यात येणारा ठपका टाळण्यासाठी चीनने कोरोनाव्हायरसची माहिती सातत्याने दडपून ठेवली. तसेच त्याचा उगम इतर देशांमध्ये झाल्याचे फुटकळ दावेही प्रसिद्ध केले. कोरोना साथीबाबत बोलणार्‍या चिनी संशोधकांची बोलती बंद करण्यात आली. अनेक पत्रकारांनाही गायब करण्यात आले होते. या वर्षाच्या सुरुवातीला ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ‘वुहान लॅब’चा संबंध नाकारण्यात आला होता. मात्र अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी कोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या वुहान लॅबमधूनच झाल्याचा उघड आरोप केला होता.

त्यानंतर अमेरिकेच्या अनेक वरिष्ठ नेते, अधिकारी तसेच संशोधकांनी वुहान प्रयोगशाळेकडेच बोट दाखविले होते. चीनमधून बाहेर पडलेल्या एका संशोधिकेनेही आपल्याकडे यासंदर्भात पुरावे असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकी यंत्रणांना ‘वुहान लॅब लीक’ची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘वुहान लॅब लीक थिअरी’चा मुद्दा ऐरणीवर आला. गेल्याच महिन्यात, ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’चे (डब्ल्यूएचओ) प्रमुख संशोधक पीटर बेन एम्बारेक यांनी, कोरोनाची साथ वुहान लॅबमधूनच सुरू झाली असण्याची शक्यता अधिक आहे, असा दावा केला होता.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info