युक्रेनवर आक्रमण केल्यास रशियाला ‘ग्लोबल फायनान्शिअल सिस्टिम’पासून तोडले जाईल

- अमेरिकेचा इशारा

युक्रेनवर आक्रमण

वॉशिंग्टन/मॉस्को – रशियाने युक्रेनवर आक्रमणाचा प्रयत्न केल्यास रशियाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक व्यवहारांच्या यंत्रणेपासून तोडले जाईल, असा इशारा अमेरिकेने दिला. त्याचे गंभीर परिणाम रशियन उद्योग व जनतेच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याच्या, प्रवासाच्या तसेच व्यापाराच्या क्षमतांवर होईल, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या अधिकारी व्हिक्टोरिआ नुलँड यांनी बजावले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात झालेल्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर नुलँड यांनी दिलेला हा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लष्करी जमवाजमव केल्याचे उघड झाले आहे. गेल्या दशकात क्रिमिआ व पूर्व युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांप्रमाणे पुन्हा आक्रमण करून युक्रेन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे दावे पाश्‍चात्यांकडून करण्यात येत आहेत. मात्र रशियाने हे दावे फेटाळले असून पाश्‍चात्य देशांच्या हालचालीच चिथावणी देणार्‍या असल्याचे प्रत्युत्तर दिले आहे. मात्र पाश्‍चात्य देशांनी आपली भूमिका अधिक आक्रमक केली असून रशियाला जबर किंमत मोजणे भाग पडेल, असे बजावले आहे.

युक्रेनवर आक्रमण

सोमवारी अमेरिकेसह मित्रदेशांनी रशियाला इशारा देताना गंभीर परिणामांची जाणीव करून दिली होती. त्यात लष्करी प्रत्युत्तर देण्याबरोबरच कठोर निर्बंधांचाही समावेश होता. मंगळवारी अमेरिका व रशियाच्या राष्ट्राध्यक्षांदरम्यान झालेल्या चर्चेतही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी कडक आर्थिक निर्बंधांचा उल्लेख केला. अमेरिकेच्या माध्यमांनीही यासंदर्भातील वृत्त देताना, रशियाला ‘स्विफ्ट’ या आंतरराष्ट्रीय बॅकिंग यंत्रणेपासून तोडण्यात येण्याची शक्यता वर्तविली होती. परराष्ट्र विभागाच्या अधिकारी नुलॅण्ड यांच्या वक्तव्याने याला दुजोरा मिळाल्याचे दिसत आहे.

युक्रेनवर आक्रमण

‘रशियाला लक्ष्य करण्यासाठी अनेक राजनैतिक पर्याय सुचविण्यात आले आहेत. आर्थिक व्यवहारांच्या यंत्रणेपासून रशियाला पूर्णपणे वेगळे पाडणे हा एक पर्याय आहे. याचे परिणाम रशियन उद्योग व जनतेला भोगावे लागतील. त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याच्या, प्रवासाच्या तसेच व्यापाराच्या क्षमतांवर निर्बंध येतील’, असे नुलॅण्ड यांनी बजावले. यापूर्वी २०१४ साली रशियावर आर्थिक निर्बंध लादत असतानाही ‘स्विफ्ट’ या यंत्रणेपासून रशियाला तोडण्याचा पर्याय समोर आला होता. त्यानंतर रशियानेही चीनच्या सहाय्याने पर्यायी यंत्रणेची चाचपणी करण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी, रशिया हा चीनचे शेपूट बनून राहण्याचा धोका आहे, असा इशारा दिला आहे. अमेरिका व रशियामध्ये अनेक मतभेद असले तरी चीनसारख्या मुद्यांवर दोन देशांमध्ये चर्चा होऊ शकते, असा दावाही त्यांनी यावेळी केला. काही दिवसांपूर्वी बोल्टन यांनी, अमेरिका व युरोपऐवजी चीनबरोबर जवळीक करणे ही रशियाची घोडचूक असल्याचे बजावले होते. भविष्यात शतकातील उर्वरित सर्व काळ चीनबरोबर घालविण्याचा निर्णय रशियाच्या फारशा हिताचा ठरणार नाही, असा दावाही अमेरिकेच्या माजी सुरक्षा सल्लागारांनी केला होता.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info