युक्रेनच्या प्रमुख शहरांवरील रशियाने हवाई हल्ले वाढविले

युक्रेनच्या प्रमुख शहरांवरील रशियाने हवाई हल्ले वाढविले

किव्ह – राजधानी किव्हचा ताबा घेऊ पाहणार्‍या रशियन सैन्याला आपल्या लष्कराने थोपवून धरल्याचा दावा युक्रेनने केला आहे. तर युक्रेनच्या मारिओपोल शहरावरील रशियाचे हल्ले अधिकच तीव्र झाले आहेत. हवाई हल्ले, तोफांचा भडीमार यांनी युक्रेनच्या शहरांची वाताहत झाली असून युक्रेनच्या ३५ लाख नागरिकांनी जीवाच्या भितीने इतर देशांमध्ये धाव घेतली आहे.

हवाई हल्लेगेल्या २४ तासात युक्रेनी लष्कराच्या १३७ ठिकाणांवर घणाघाती हल्ले चढवून ही ठिकाणे नष्ट करण्यात आल्याची माहिती रशियन लष्कराने दिली. तर रशिया वॅग्नर मर्सिनरिज् अर्थात कंत्राटी सैनिक पाठवून त्याचा युक्रेनच्या विरोधात वापर करीत असल्याचे आरोप युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केले आहेत. हे कंत्राटी सैनिक युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना संपविण्याच्या मोहिमेवर असल्याचा दावाही युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केला.

हे आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू असतानाच, रशियाने किव्ह तसेच खारकिव्ह या युक्रेनच्या शहरांवर जबरदस्त हल्ले चढविले. यामुळे युक्रेनमधून बाहेर पडून दुसर्‍या देशात आश्रय घेणार्‍या निर्वासितांच्या संख्येत दरदिवशी वाढ होत चालली आहे. सध्या ही संख्या ३५ लाखांवर गेली आहे. दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळातील हे सर्वात मोठे निर्वासितांचे संकट असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रसंघाने केला आहे. यामुळे युक्रेनची दैना उडाल्याचे उघड झाले असून यासंदर्भात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केलेले दावे विपर्यास्त असल्याचे समोर आले आहे.

युक्रेनची जनताच रशियाच्या विरोधात शस्त्रे घेऊन रत्यावर उतल्याच्या घोषणा झेलेन्स्की यांनी केल्या होत्या. त्यात काही प्रमाणात तथ्य असले तरी बहुतांश युक्रेनी जनता जीवाच्या भितीने इतर देशांमध्ये आश्रय घेण्यासाठी धावत असल्याचे समोर येत आहे. निर्वासितांची ३५ लाखांवर गेलेली संख्या हेच स्पष्ट करीत आहे. असे असले तरी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युक्रेनमधील हे युद्ध रोखण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी थेट चर्चा करण्याचा हेका सोडलेला नाही.
याबरोबरच रशियाबरोबर वाटाघाटी झाल्याच, तर त्यावर युक्रेनमध्ये सार्वमत घेतले जाईल, अशी नवी अट झेलेन्स्की यांनी रशियाच्या समोर ठेवली आहे. पण रशिया त्याला महत्त्व द्यायला तयार नाही.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info