रशियाकडून युक्रेनच्या 60 हून अधिक लष्करी ठिकाणांवर हल्ले

- युक्रेनच्या लढाऊ विमानासह क्षेपणास्त्रे व हेलिकॉप्टर्स पाडली

60 हून अधिक

मॉस्को/किव्ह – युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या खार्किव्हमधील ‘आर्म्स डेपो’ रशियाने ताब्यात घेतला. तसेच युक्रेनची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स तसेच क्षेपणास्त्रे भेदल्याचे दावे रशियन संरक्षणदलांनी केले आहेत. याबरोबरच रशियन संरक्षणदलांनी युक्रेनमधील 60 हून अधिक लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले. दरम्यान, बुधवारी चाचणी केलेले ‘सरमात’ हे अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र लवकरच रशियन लष्करात तैनात करण्याची घोषणा वरिष्ठ रशियन अधिकाऱ्यांनी केली.

काही दिवसांपूर्वीच रशियाने पूर्व युक्रेनमधील ‘डोन्बास’ व दक्षिण युक्रेनमध्ये लष्करी मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करीत असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर रशियन फौजांनी डोन्बास व दक्षिण युक्रेनमधील अनेक भागांमध्ये जोरदार हल्ले सुरू केले. डोन्बासमधील क्रेमानिनासह अनेक शहरे व भाग रशियन लष्कराने ताब्यात घेतले आहेत. मारिपोल व खेरसनसारखी महत्त्वाची शहरेही रशियन लष्कराच्या टाचेखाली आली आहेत. मायकोलेव्ह व ओडेस तसेच खार्किव्ह या युक्रेनच्या शहरांचा ताबा घेण्यासाठी रशियन लष्कराने हल्ल्यांची तीव्रता वाढविली आहे.

60 हून अधिक

शुक्रवारी संध्याकाळपासून रशियाने युक्रेनच्या 66 लष्करी ठिकाणांवर हल्ले चढविले. त्यात युक्रेनी लष्कराच्या तीन कमांड पोस्ट्ससह प्रचंड शस्त्रसाठा असणाऱ्या कोठारांचाही समावेश आहे. खार्किव्ह भागातील युक्रेनी लष्कराच्या मोठ्या ‘आर्म्स डेपो’वर रशियन लष्कराने नियंत्रण मिळविले. युक्रेनचे ‘एसयु-25′ लढाऊ विमान, तीन हेलिकॉप्टर्स तसेच क्षेपणास्त्रे पाडल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली आहे. पूर्व युक्रेनमधील कारवाईची तीव्रता वाढविण्यासाठी रशियाने मारिपोलमधील आपल्या लष्कराचे 12 ‘स्पेशल युनिट्स’ डोन्बास क्षेत्रात पाठविल्याचे समोर आले आहे. त्याचवेळी मारिपोलमध्ये ‘चेचेन फोर्स’च्या तुकड्या तैनात केल्या आहेत.

60 हून अधिक

दरम्यान, बुधवारी यशस्वी चाचणी झाल्यानंतर रशियाने आपले नवे अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ‘सरमात’ लवकरच लष्करात तैनात करण्याचे संकेत दिले. रशियन यंत्रणा ‘रॉसकॉसमॉस’चे प्रमुख दिमित्रि रोगोझिन यांनी येत्या काही महिन्यात ‘सरमात’चा समावेश असलेले पहिले मिलिटरी युनिट सक्रिय झालेले असेल, असा दावा केला. हे युनिट रशियाच्या उझूर भागात तैनात असेल, असेही रोगोझिन यांनी सांगितले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी या क्षेपणास्त्राचा उल्लेख अभेद्य असा केला होता. ‘सरमात’ क्षेपणास्त्रामुळे शत्रूला यापुढे रशियाविरोधात कुठलाही निर्णय घेण्याआधी दोनवेळा विचार करावा लागेल, असा इशाराही पुतिन यांनी दिला होता.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info