परग्रहवासियांच्या उडत्या तबकड्यांनी अमेरिकेच्या आण्विक यंत्रणेत हस्तक्षेप केला होता – ‘पेंटॅगॉन’चे माजी अधिकारी लु एलिझोन्दो यांचा दावा

UFOs

वॉशिंग्टन – परग्रहवासियांच्या उडत्या तबकड्यांना अणुऊर्जा व संबंधित घटकांमध्ये रस असून, त्यांनी अमेरिकेच्या आण्विक यंत्रणांमध्ये हस्तक्षेप केला होता, असा खळबळजनक दावा ‘पेंटॅगॉन’चे माजी अधिकारी लु एलिझोन्दो यांनी केला आहे. एलिझोन्दो यांनी संरक्षण विभागाने उडत्या तबकड्यांच्या अभ्यासासाठी स्थापन केलेल्या गटाचे संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांनी केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरले ओहे.

लु एलिझोन्दो

लु एलिझोन्दोगेल्या काही वर्षात अमेरिकेतील काही अधिकारी तसेच संसद सदस्य सातत्याने परग्रहवासिय व उडत्या तबकड्यांचा मुद्दा उपस्थित करीत आहेत. त्याचा आधार घेऊन अमेरिकी सिनेटच्या इंटेलिजन्स कमिटीने गेल्या वर्षी संरक्षणमंत्री व ‘डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स’कडून उडत्या तबकड्यांबाबत अहवाल मागविला होता. अमेरिकेच्या संसदेत येत्या काही दिवसात हा ‘अनक्लासिफाईड रिपोर्ट’ सादर करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकी वर्तुळात परग्रहवासिय व उडत्या तबकड्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अमेरिकेच्या आघाडीच्या प्रसारमाध्यमांकडून माजी राष्ट्राध्यक्ष, संसद सदस्य, अमेरिकी संरक्षणदलात काम करणारे माजी वैमानिक तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. लु एलिझोन्दो हे संरक्षण विभागाने स्थापन केलेल्या ‘अ‍ॅडव्हान्स्ड् एरोस्पेस थ्रेट आयडेंटिफिकेशन प्रोग्राम’चे(एएटीआयपी) संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या आघाडीच्या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आण्विक क्षमतांमधील हस्तक्षेपाबाबत वक्तव्य केले.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/uap-took-us-nuclear-systems-offline-says-luis-elizondo/