रशियाकडून डोन्बास क्षेत्रातील 40हून अधिक शहरांवर आक्रमक हल्ले

डोन्बास क्षेत्रातील 40हून अधिक

मॉस्को/किव्ह – रशियाने बुधवारपासून डोन्बास क्षेत्रातील 40हून अधिक शहरे व नजिकच्या भागांवर जोरदार हल्ले केल्याची माहिती युक्रेनने दिली आहे. डोन्बासमधील काही भागांवर सातत्याने तोफा, रणगाडे व रॉकेट्सचा मारा होत असून यात अनेकांचा बळी गेल्याचाही दावा करण्यात आला आहे. रशियाच्या या अभूतपूर्व हल्ल्यांपुढे लुहान्स्कमधील युक्रेनियन फौजांना माघार घेणे भाग पडल्याचा दावा स्थानिक अधिकाऱ्यांनी केला. युक्रेनमधील हल्ल्यांची तीव्रता वाढवित असतानाच रशियाच्या संसदेने लष्करात सामील होण्यासाठीची वयोमर्यादा वाढविणारे विधेयक मंजूर केले आहे. यामुळे रशिया नजिकच्या काळात युक्रेनमधील लष्करी तैनाती अधिक वाढविण्याचे संकेत मिळत आहेत.

डोन्बास क्षेत्रातील 40हून अधिक

यापूर्वी रशियन फौजांनी मारिपोल शहरावर ताबा मिळविण्यासाठी जबरदस्त हल्ले चढविले होते. त्यानंतर आता डोन्बाससाठी रशियन फौजा सर्वशक्तिनिशी उतरल्याचे दिसत आहे. गेल्या आठवड्यापासून रशियाने हल्ल्यांची तीव्रता वाढविण्यास सुरुवात केली होती. बुधवारी एकाचवेळी 40हून अधिक शहरे व भागांवर चढविलेले हल्ले लक्ष वेधून घेणारे ठरतात. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असणाऱ्या युद्धात प्रथमच युक्रेनचे अधिकारी रशियन हल्ल्यांच्या तीव्रतेपुढे युक्रेनचा प्रतिकार हतबल ठरत असल्याची कबुली देत आहेत.

डोन्बास क्षेत्रातील 40हून अधिक

आतापर्यंतच्या संघर्षातील सवाधिक तीव्रतेचा संघर्ष डोन्बासमध्ये सुरू असल्याची प्रतिक्रिया युक्रेनच्या वरिष्ठ मंत्र्यांनी दिली. सेव्हेरोडोनेत्स्क, लिमन व लिशिचान्स्क या तीन शहरांना रशियन फौजांनी लक्ष्य बनविले आहे. लिमनवर ताबा मिळविण्यात रशिया यशस्वी ठरली तर पुढील काही दिवसात ‘स्लोव्हिआन्स्क’ हे महत्त्वाचे शहरही रशियन फौजांच्या ताब्यात जाईल, असे संकेत युक्रेनचेच अधिकारी देत आहेत. डोन्बासचा भाग असलेल्या लुहान्स्कच्या बहुतांश भागात सध्या रशियाने वर्चस्व मिळविल्याची माहिती स्थानिक युक्रेनियन अधिकाऱ्यांनी दिली. या संघर्षात रशिया हवाईहल्ले व ‘आर्टिलरी फायर’चा प्रभावी वापर करीत असल्याचेही समोर आले आहे. डोन्बासपाठोपाठ खार्किव्ह शहरावरही बुधवारी क्षेपणास्त्र हल्ले झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

डोन्बास क्षेत्रातील 40हून अधिक

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी ज्येष्ठ अमेरिकी मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांच्या वक्तव्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. रशियाबरोबरील शांततेसाठी युक्रेन आपला भूभाग कधीही सोडणार नाही, असे झेलेन्स्की यांनी बजावले. किसिंजर यांच्याकडील कॅलेंडरवर बहुधा 1938 हे साल असावे, पण हे 2022 सुरू आहे, असा टोला झेलेन्स्की यांनी लगावला. 1938 सालचा उल्लेख हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झालेल्या झेक रिपब्लिकच्या कराराचा संदर्भ देणारा मानला जातो.

जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी, युक्रेनमधील शांततेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना मिळणार नाही, असा इशारा दिला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info