लुहान्स्कवरील ताब्यानंतर रशियाने डोनेत्स्कमधील हल्ल्यांची तीव्रता वाढविली

हल्ल्यांची तीव्रता

मॉस्को/किव्ह – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनच्या लुहान्स्क प्रांतावर मिळविलेल्या संपूर्ण ताब्याबद्दल रशियन संरक्षणदलाचे अभिनंदन केले आहे. त्याचवेळी लुहान्स्कवरील मोहीम यशस्वी करणाऱ्या रशियन तुकड्यांनी काही काळ थांबून पुन्हा सज्ज व्हावे व नव्या कारवाईला सुरुवात करावी, असे आदेशही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिल्याचे वृत्त रशियन वृत्तसंस्थेने दिले आहे. लुहान्स्कवर नियंत्रण मिळविल्यानंतर रशियन फौजांनी डोन्बासमधील डोनेत्स्क प्रांताकडे आपले लक्ष वळविले आहे. या प्रांतातील बाखमत व स्लोव्हियान्स्क शहरावरील हल्ल्यांची तीव्रता वाढल्याची माहिती युक्रेनी अधिकाऱ्यांनी दिली.

हल्ल्यांची तीव्रता

रशियाने लुहान्स्क प्रांतावर मिळविलेला ताबा हा युक्रेनसाठी मोठा धक्का असल्याचा दावा पाश्चिमात्य विश्लेषक करीत आहेत. रशियाच्या सातत्याने होणाऱ्या आक्रमक हल्ल्यांपुढे टिकाव धरण्यात युक्रेनी लष्कर कमी पडल्याचे लुहान्स्कमध्ये दिसून आले, याकडे ब्रिटनमधील अभ्यासगटाने लक्ष वेधले. रशियन लष्कराच्या ‘हेवी मेकॅनाईझ्ड् ब्रिगेड’चा मुकाबला करण्याची क्षमता युक्रेनी पथकांकडे नसल्याचा उल्लेखही अभ्यासगटाच्या अहवालात करण्यात आला. जवानांचे जीव वाचविण्यासाठी लिशिचान्स्कमधून माघार घेतल्याचा दावा युक्रेन करीत असली तरी सामरिकदृष्ट्या त्याला फारसा अर्थ नाही, याकडे पाश्चिमात्य विश्लेषकांनी लक्ष वेधले.

हल्ल्यांची तीव्रता

लुहान्स्कचे यश रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन व संरक्षणदलांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरु शकतो. युक्रेनमधील एक प्रांत पूर्णपणे ताब्यात येणे हे रशियन फौजांसाठी मोठे यश ठरते. या यशाच्या बळावर रशियन लष्कर डोन्बास क्षेत्रातील उर्वरित भाग ताब्यात घेण्यासाठी अधिक निर्धाराने आगेकूच करेल, अस मानले जाते. सोमवारपासून बाखमत व स्लोव्हियान्स्कसारख्या शहरांवर सुरू झालेले मोठे हल्ले त्याचाच भाग ठरतो. डोन्बासचा भाग असलेल्या डोनेत्स्क प्रांतातील 30 टक्क्यांहून अधिक भागावर रशियन फौजा व समर्थक बंडखोरांचे नियंत्रण असून त्यात राजधानी डोनेत्स्क व मारिपोलसारख्या शहराचा समावेश आहे.

लुहान्स्क गमावल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी हा भाग पुन्हा ताब्यात घेण्यासाठी संघर्ष करु, असा इशारा दिला आहे. युक्रेनला समर्थन देणाऱ्या पाश्चिमात्य देशांनीही पुन्हा एकदा युक्रेनला दीर्घकाळपर्यंत सहाय्य देण्याचे आश्वासन दिले आहे. अमेरिकेने 80 कोटी डॉलर्सचे नवे संरक्षणसहाय्य जाहीर केले असून ऑस्ट्रेलियाने 10 कोटी डॉलर्सच्या सहाय्याची घोषणा केली आहे. तर जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी, युक्रेनला सुरक्षाविषयक हमी देण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे.

दरम्यान, युक्रेनच्या पुनर्ऊभारणीसाठी तब्बल 750 अब्ज असा दावा युक्रेनच्या नेतृत्त्वाने केला.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info