अमेरिकेकडून युक्रेनसाठी एक अब्ज डॉलर्सचे नवे संरक्षणसहाय्य घोषित

एक अब्ज

वॉशिंग्टन/किव्ह/मॉस्को – पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला देण्यात येणाऱ्या शस्त्रास्त्रांपैकी अवघी ३० टक्के शस्त्रे युक्रेनच्या संरक्षणदलांपर्यंत पोहोचत असल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले होते. अमेरिकी माध्यमांनी दिलेल्या या वृत्तानंतर काही दिवसातच अमेरिकेच्या संरक्षण विभागाने युक्रेनला एक अब्ज डॉलर्सच्या नव्या संरक्षणसहाय्याची घोषणा केली आहे. दरम्यान, झॅपोरिझिआमध्ये असणाऱ्या अणुप्रकल्पावरील हल्ल्यांचा मुद्दा अधिकच चिघळला असून युक्रेनकडून त्यावर होणारे हल्ले संपूर्ण युरोप खंडाला ओलिस धरणारे आहेत, असा आरोप रशियाने केला.

एक अब्ज

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेकडून जवळपास दर आठवड्याला युक्रेनला नव्या शस्त्रांच्या पुरवठ्याची घोषणा करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरातच अमेरिकेने युक्रेनला सुमारे नऊ अब्ज डॉलर्सच्या शस्त्रपुरवठ्याची घोषणा केली आहे. सोमवारी घोषित केलेले शस्त्रसहाय्य आतापर्यंतचे सर्वात मोठे सहाय्य असल्याचे सांगण्यात येते. यात, ‘हायमार्स रॉकेट सिस्टिम’साठी अतिरिक्त रॉकेट्स, ‘नॅसॅम्स’ क्षेपणास्त्र यंत्रणेसाठी नवी क्षेपणास्त्रे, एक हजार ‘जॅवलिन मिसाईल्स’, ५० सशस्त्र वाहने, २० ‘१२० एमएम मॉर्टर सिस्टिम्स’, ७५ हजार तोफगोळे, २० हजार मॉर्टर्स, ‘एटी-४ अँटी आर्मर सिस्टिम्स’, ‘सी४’ स्फोटके व वैद्यकीय सहाय्याचा समावेश आहे. संरक्षणसहाय्यापाठोपाठ अमेरिकेच्या कोषागार विभागाने युक्रेनला तीन अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्यही जाहीर केले आहे.

एक अब्ज

अमेरिकेकडून मिळणाऱ्या शस्त्रांच्या जोरावर युक्रेन दक्षिण युक्रेनमधील प्रतिहल्ल्यांची मोहीम अधिक आक्रमकपणे राबवू शकेल, असा दावा विश्ेलषकांकडून करण्यात आला आहे. मात्र अमेरिकेकडून शस्त्रसहाय्य वाढत असतानाच रशियानेही आपल्या हल्ल्यांची तीव्रता अधिक वाढविली आहे. सोमवारपासून रशियन फौजांनी डोन्बासच्या सोलेदार, पिस्की व बाखमतमध्ये जबर हल्ले चढवून काही भाग ताब्यात घेण्यात यश मिळविल्याची माहिती संरक्षण विभागाने दिली. रशियन लष्कराकडून एकापाठोपाठ एक हल्ल्यांची मालिका सुरू असल्याचा दावा युक्रेनने केला आहे.

एक अब्ज

दरम्यान, झॅपोरिझिआमधील अणुप्रकल्पावर होणाऱ्या हल्ल्यांचा मुद्दा अधिकच चिघळला आहे. युक्रेनचे लष्कर या अणुप्रकल्पानजिकच्या परिसरात सातत्याने हल्ले करीत असल्याचा आरोप रशियाने केला. हे हल्ले अतिशय धोकादायक असून त्याचे गंभीर परिणाम युरोपला भोगावे लागतील, असा इशारा रशियाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी दिला. युक्रेनला सहकार्य करणाऱ्या देशांनी हे हल्ले रोखण्यासाठी युक्रेनवर दबाव टाकायला हवा, अशी मागणीही पेस्कोव्ह यांनी केली. युक्रेनने रशियाचे आरोप फेटाळले असून रशियाने या प्रकल्पाचे रुपांतर लष्करी तळात केल्याचा दावा केला आहे.

अणुप्रकल्पाचा मुद्दा चिघळत असतानाच रशियाने अमेरिकेबरोबरील ‘न्यू स्टार्ट टीि’ या महत्त्वपूर्ण करारातून माघारीचे संकेत दिले आहेत. पाश्चिमात्यांनी लादलेल्या निर्बंधांचे कारण पुढे करून करारातील महत्त्वपूर्ण तरतूद स्थगित करण्यात येत असल्याचे रशियाकडून सांगण्यात आले. त्यानुसार, पुढील काही कालावधीसाठी अमेरिकी यंत्रणेला रशियातील ‘न्यूक्लिअर मिलिटरी साईट्स’ना भेट देता येणार नाही.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info