रशियाचे खार्किव्हसह डोन्बासमधील तीन शहरांवर जबरदस्त हल्ले

- युक्रेनच्या कमांड पोस्टस्‌‍सह शस्त्रसाठा उद्ध्वस्त

किव्ह/मॉस्को – झ्ॉपोरिझ्ािआ अणुप्रकल्पाच्या मुद्यावरून युक्रेनसह पाश्चिमात्य देश रशियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असतानाच रशियाने युक्रेनच्या विविध भागांमध्ये जोरदार हल्ले चढविले आहेत. रविवारी रशियन फौजांनी ईशान्य युक्रेनमधील खार्किव्ह प्रांतात मोठे हल्ले करून उडि या शहराचा ताबा घेतला. त्याचवेळी डोन्बास प्रांतातील स्लोव्हियान्स्क, सिव्हेर्स्क व बाखमत आणि दक्षिणेतील मायकोलेव्हलाही रशियाने लक्ष्य केले. खेर्सन व खार्किव्हमध्ये केलेल्या हल्ल्यांमध्ये 200 परदेशी जवानांसह शंभराहून अधिक युक्रेनी जवान ठार झ्ााल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली आहे. दरम्यान, रशियाच्या ताब्यात असलेल्या खेर्सनमधील रेल्वे ब्रिज तसेच रशियन लष्करी कंपनी ‘वॅग्नर ग्रुप’चा तळ उडवून दिल्याचा दावा युक्रेनने केला.

गेले काही दिवस रशियाच्या ताब्यात असलेल्या झ्ॉपोरिझ्ािआमधील अणुऊर्जा प्रकल्पाचा मुद्दा चिघळत असल्याचे दिसत आहे. या प्रकल्पावर गेल्या महिन्याभरात चार ते पाचवेळा हल्ले झ्ााले आहेत. या हल्ल्यांवरून रशिया व युक्रेनने परस्परांवर आरोप केले आहेत. रशियाने हा मुद्दा सुरक्षा परिषदेत उपस्थित केला होता. त्याचवेळी प्रकल्पावर हल्ला होऊन मोठी दुर्घटना घडल्यास युक्रेनला समर्थन देणारे पाश्चिमात्य देश त्याला जबाबदार असतील, असा आरोपही केला होता. तर रशिया ‘न्यूक्लिअर ब्लॅकमेल’ करीत असल्याचे युक्रेनने म्हटले होते. झ्ॉपोरिझ्ािआचा मुद्दा तापलेला असतानाच रशियाने पुन्हा लष्करी हल्ल्यांची तीव्रता वाढविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 48 तासांमध्ये रशियाने डोन्बासमधील पिस्कीपाठोपाठ खार्किव्हमधील उडि भागावर ताबा मिळविण्यात यश मिळविले आहे. त्याचवेळी उग्लेदर व बाखमतनजिक युक्रेनी लष्कराची बचावफळी मोडून आगेकूच केल्याची माहितीही रशियाच्या संरक्षण विभागाने दिली.

ईशान्य युक्रेनमधील खार्किव्हपासून दक्षिण युक्रेनमधील मायकोलेव्हपर्यंत युक्रेनी लष्कराच्या तुकड्यांवर रशियाने घणाघाती हल्ले चढविले आहेत. यासाठी रशियन सैन्याने रणगाडे, तोफा, रॉकेट लाँचर्स तसेच क्षेपणास्त्रांचा वापर केला. बाखमत व खेर्सनमध्ये केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनच्या डिफेन्स ब्रिगेड तसेच इन्फंट्री ब्रिगेडच्या कमांड पोस्ट्स देखील रशियन सैन्याने उद्ध्वस्त केल्या. तर खार्किव्ह तसेच मायकोलेव्हमध्ये तीन शस्त्रसाठ्यांचे तळ तसेच इंधनाचे दोन साठे नष्ट करून रशियन सैन्याने युक्रेनी लष्कराला धक्का दिला आहे. तर युक्रेनी लष्करावर खेर्सनमध्ये झ्ाालेल्या कारवाईत दीडशेहून अधिक जवान ठार झ्ााले आहेत. तर खार्किव्हवर केलेल्या माऱ्यात दोनशेहून अधिक परदेशी जवानांचा बळी गेल्याचे व 100 जण जखमी झ्ााल्याचे रशियाच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, युक्रेनने रशियाच्या ताब्यात असलेल्या खेर्सनमध्ये हल्ला करून रेल्वे ब्रिज उडवून दिल्याचा दावा केला. रशियाच्या रसदीसाठी हा पूल महत्त्वाचा होता, असे सांगण्यात येते. त्यापाठोपाठ डोनेत्स्क प्रांतात रशियाची खाजगी लष्करी कंपनी ‘वॅग्नर ग्रुप’चा मोठा तळ उडवून दिल्याचेही युक्रेनकडून सांगण्यात आले.

Englishहिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info