अझरबैजानच्या हल्ल्यात आर्मेनियाचे ४९ जवान ठार

४९ जवान

मॉस्को – काही तासांपूर्वी लागू केलेली संघर्षबंदी मोडून अझरबैजानने आपल्या सीमेवर केलेल्या रॉकेट हल्ल्यांमध्ये ४९ जवान मारले गेल्याचा आरोप आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिन्यान यांनी केला. याआधी दोन्ही देशांमधील संघर्षाचे केंद्र बनलेल्या नागोर्नो-काराबाख या प्रांताचा अपवाद वगळता अझरबैजानचे लष्कर आर्मेनियाच्या पश्चिमेकडील सीमेवर हल्ले चढवित आहे. रशिया पुरस्कृत लष्करी गटाने अझरबैजानच्या या आक्रमतेविरोधात आपल्याला सहाय्य करावे, असे आवाहन पंतप्रधान निकोल यांनी केले. रशियाने देखील सीमेवर स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी आर्मेनियाला सहाय्य करणार असल्याचे जाहीर केले.

४९ जवान

जगातील वादग्रस्त मुद्यांमध्ये समावेश असलेल्या नागोर्नो-काराबाख या स्वायत्त प्रांतावर ताबा मिळविण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून अझरबैजानचे लष्कर हल्ले चढवित होते. सोमवारी अझरबैजान आणि आर्मेनियामध्ये नव्याने संघर्षबंदी लागू करण्यात आली होती. पण सोमवारच्या मध्यरात्रीनंतर अझरबैजानच्या लष्कराने थेट आर्मेनियाच्या सीमेवर रॉकेट तसेच तोफांचे हल्ले सुरू केले. आर्मेनियाच्या पूर्वेकडील गोरिस, सोत्क, जेरमूक या शहरांमधील लष्करी चौक्यांवर अझरबैजाने तोफगोळे डागले. या हल्ल्यांमध्ये आर्मेनियन लष्कराचे ४९ जवान मारले गेले.

अझरबैजानने पुन्हा एकदा संघर्षबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप आर्मेनियाने केला. तर आर्मेनियाने अझरबैजानच्या पश्चिमेकडील सीमेवर केलेल्या कारवाईला उत्तर देण्यासाठी आपणे हल्ले चढविल्याचे अझेरी लष्कराने म्हटले आहे. आर्मेनियाच्या लष्कराने अझरबैजानच्या दाशकेसान, केल्बाजार आणि लाशिन या सीमाभागात भुसुरूंग पेरले होते. त्यामुळे आर्मेनियाला अद्दल घडविण्यासाठी ही कारवाई केल्याचा दावा अझेरी लष्कराने केला. अझरबैजानच्या या कारवाईचे तुर्की आणि पाकिस्तानने लगेच समर्थन केले. तसेच या संघर्षात आपण अझरबैजानच्या पाठिशी असल्याचे जाहीर केले.

४९ जवान

आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल यांनी देखील रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. रशिया पुरस्कृत लष्करी गटाने या संघर्षात अझरबैजानच्या विरोधात आर्मेनियाला साथ द्यावी, असे आवाहन पंतप्रधान निकोल यांनी केले. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आर्मेनिया आणि अझरबैजानला हल्ले थांबवून या क्षेत्रात संघर्षबंदी आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. यानंतर रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू आणि आर्मेनियाचे संरक्षणमंत्री सुरेन पापिक्यान यांच्यात चर्चा झाली. यानंतर रशियन संरक्षणमंत्र्यांनी वादग्रस्त सीमेवर स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी आर्मेनियाला सहाय्य करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मध्य आशियामध्ये दोन वर्षांपूर्वीची संघर्षस्थिती निर्माण झाल्याचा दावा केला जातो.

याआधी २०२० साली आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये सहा आठवड्यांचा संघर्ष पेटला होता. नागोर्नो-काराबाख या स्वायत्त प्रांताच्या ताब्यासाठी पेटलेल्या या संघर्षात ६.६०० जणांचा बळी गेला होता. त्यानंतर रशियाने पुढाकार घेऊन आर्मेनिया आणि अझरबैजान या माजी सोव्हिएत देशांमध्ये संघर्षबंदी लागू केली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये नागोर्नो-काराबाखवरुन संघर्षबंदीचे उल्लंघन झाले होते. पण सोमवारी मध्यरात्रीनंतर अझरबैजान आणि आर्मेनियात पेटलेला संघर्ष दोन्ही देशांमधील वाद वेगळ्या वळणावर नेणारा असल्याचा इशारा लष्करी विश्लेषक देत आहेत.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info