क्रिमिआला रशियाशी जोडणाऱ्या ब्रिजवरील भीषण स्फोटामुळे खळबळ

- युक्रेनकडून रशियाला चिथावणी देणाऱ्या प्रतिक्रिया

रशियाशी जोडणाऱ्या

मॉस्को/किव्ह – 2014 साली युक्रेनपासून तोडून रशियाने ताब्यात घेतलेल्या क्रिमिआ प्रांताला रशियाशी जोडणाऱ्या कर्च ब्रिजवर भीषण स्फोट झाला. स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे हा घातपात घडविण्यात आला. याची जबाबदारी युक्रेनने स्वीकारलेली नसली, तर हा या स्फोटानंतर युक्रेनकडून विजयी प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. फेब्रुवारी महिन्यात जलसमाधी मिळालेली रशियन नौदलाची गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर मॉस्कोवा आणि कर्च ब्रिज या दोन्ही रशियाच्या सामर्थ्याची युक्रेनमधील प्रतिके आता नष्ट झाली आहेत, असे युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचे सहकारी मिखाईल पोडोलियाक यांनी, कर्च ब्रिज ही तर केवळ सुरूवात आहे, असे सांगून रशियाला चिथावणी दिली. युक्रेनकडून आलेल्या प्रतिक्रिया या देशाच्या नेतृत्त्वाची दहशतवादी प्रवृत्ती जगजाहीर करीत असल्याचा ठपका रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ठेवला आहे.

रशियाशी जोडणाऱ्या

स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी सहा वाजता कर्च ब्रिजवर हा स्फोट झाला. यात तीन जणांचा बळी गेल्याची माहिती रशियाने दिली आहे. 2014 साली रशियाने युक्रेनच्या क्रिमिआवर हल्ला चढवून त्याचा ताबा घेतला व हा भूभाग रशियन संघराज्याला जोडून टाकला होता. त्यानंतर क्रिमिआला रशियाशी जोडण्यासाठी कर्च ब्रिजची उभारणी करण्यात आली होती. 3.6 अब्ज डॉलर्सचा प्रकल्प राबवून 19 किलोमीटर लांबीचा हा ब्रिज उभारण्यात आला व 2018 साली रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या हस्ते याचे उद्घाटन पार पडले होते. हा युरोपातील सर्वाधिक लांबीचा पूल मानला जातो. शनिवारी झालेल्या स्फोटानंतर हा पूल पूर्णपणे बंद पडला आहे. क्रिमिआवरील रशियाच्या अवैध ताबा यामुळे धोक्यात आल्याचे संकेत देऊन युक्रेनकडून यावर विजयी प्रतिक्रिया नोंदविल्या जात आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या 70 व्या वाढदिवशीच हा स्फोट घडवून युक्रेन तसेच पाश्चिमात्यांनी पुतिन यांना सदिच्छा दिल्याचा दावा काहीजणांनी केला आहे. मात्र जगभरातील विश्लेषक यावर रशियाकडून जहाल प्रतिक्रिया आल्यावाचून राहणार नाही, अशी चिंता व्यक्त करीत आहेत. आपल्या विरोधातील कुठल्याही कारवाया अत्यंत गांभीर्याने घेणारा रशियासारखा देश या घातपाताला जबरदस्त प्रत्युत्तर देईल आणि यानंतर युक्रेनच्या युद्धाची तीव्रता अनेकपटींनी वाढेल, असे आंतरराष्ट्रीय माध्यमेही सांगू लागली आहेत. त्यातच युक्रेनचे संरक्षण मंत्रालय व युक्रेनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या सहकाऱ्यांनी यावर रशियाला चिथावणी देणारी प्रतिक्रिया नोंदविली आहे.

रशियाशी जोडणाऱ्या

रशियन नौदलाची गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर अर्थात विध्वंसिका मॉस्कोवा आणि कर्च ब्रिज या दोन्ही रशियाच्या सामर्थ्याचे प्रतिक असलेल्या गोष्टी आता नष्ट झालेल्या आहेत, असा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केला. युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतर रशियन नौदलाची मॉस्कोवा या विध्वंसिकेला आपण जलसमाधी दिल्याचा दावा युक्रेनने केला होता. त्यानंतर आता कर्च ब्रिज नष्ट झाला आहे. ही बाब रशियाचे सामर्थ्य क्षीण झाल्याचे निदर्शक असल्याचे संकेत युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात येत आहेत. इतकेच नाही तर राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचे सहकारी मिखाईल पोडोलियाक यांनी कर्च ब्रिज ही केवळ सुरूवात असल्याचे सांगून पुढच्या काळात रशियाला जबरदस्त हानी सोसावी लागेल, असा इशारा दिला आहे. याची नोंद रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेली आहे.

रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाकारोव्हा यांनी या प्रतिक्रिया युक्रेनी नेतृत्त्वाच्या दहशतवादी प्रवृत्तीचे प्रदर्शन करणाऱ्या असल्याचा ठपका ठेवला आहे.

हिंदी

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info