रशियाकडून युक्रेनवर शंभरहून अधिक क्षेपणास्त्रे व ड्रोन्सचा मारा

- काही क्षेपणास्त्रे मोल्दोवा व रोमानियानजिक कोसळल्याचे दावे

मॉस्को/किव्ह – युक्रेनमधील मोहिमेला जवळपास एक वर्ष पूर्ण होत असतानाच रशियाने पुन्हा एकदा आपली लष्करी ताकद व सामर्थ्य दाखवून दिले आहे. गुरुवारी रात्री तसेच शुक्रवारी सकाळी युक्रेनवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले करण्यात आले. राजधानी किव्हसह खार्किव्ह, ओडेसा अशा 10 प्रांतांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात येते. डिसेंबर महिन्यानंतर पहिल्यांदाच रशियाने इतक्या प्रचंड प्रमाणात क्षेपणास्त्रे व ड्रोन्सचा वापर करून हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे युक्रेनमधील अनेक शहरांमध्ये पुन्हा एकदा ‘ब्लॅकआऊट’ निर्माण झाल्याचे समोर आले. हा हल्ला रशियाचे नवे आक्रमण सुरू झाल्याचे पूर्वसंकेत असल्याचा दावा युक्रेनी अधिकाऱ्यांनी केला.

क्षेपणास्त्रे व ड्रोन्सचा

गुरुवारी रात्रीपासून रशियाची लढाऊ विमाने व ‘व्लॅक सी’मधील युद्धनौकांवरून क्षेपणास्त्रांचे हल्ले सुरू झाले. शुक्र्रवारी दुपारपर्यंत सुरू असलेल्या या माऱ्यात तब्बल 106 क्षेपणास्त्रे व सात ‘अटॅक ड्रोन्स’चा वापर करण्यात आला. यात 71 कॅलिबर, ‘केएच-101’ व ‘केएच-555’ क्षेपणास्त्रांसह 35 ‘एस-300’ क्षेपणास्त्रांचा समावेश होता, अशी माहिती युक्रेनच्या संरक्षण विभागाने दिली. यातील जवळपास 60 क्षेपणास्त्रे युक्रेनच्या लष्कराने पाडल्याचा दावाही करण्यात आला.

क्षेपणास्त्रे व ड्रोन्सचा

राजधानी किव्ह, खार्किव्ह, ओडेसा, डिनिप्रोपेट्रोव्हस्क, विनित्सिआ, झायटोमिर यासह युक्रेनच्या बहुतांश भागांमधील प्रांत व त्यातील प्रमुख शहरांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यामुळे युक्रेनच्या बहुतांश शहरांमध्ये पुन्हा एकदा ‘ब्लॅकआऊट’ घोषित करण्यात आला आहे. युक्रेनच्या दक्षिणेस डागलेली काही क्षेपणास्त्रे मोल्दोव्हा तसेच रोमानियानजिक पडल्याचे सांगण्यात येते. रशियन क्षेपणास्त्रांनी आपल्या हवाईहद्दीचा भंग केल्याचा आरोप मोल्दोव्हाकडून करण्यात आला. तर रोमानियाच्या सीमेपासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावरून रशियन क्षेपणास्त्र गेल्याचे स्थानिक सूत्रांनकडून सांगण्यात आले.

क्षेपणास्त्रे व ड्रोन्सचा

रशियाच्या या हल्ल्यांमुळे युक्रेन व पाश्चिमात्य आघाडीकडून सातत्याने करण्यात येणारे दावे खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे. युक्रेन व त्याला समर्थन देणाऱ्या अमेरिका तसेच युरोपिय देशांनी रशियाची लष्करी ताकद क्षीण होत चालल्याचे मोठे दावे केले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमधील क्षेपणास्त्रांचे हल्लेही रशियाचे अखेरचे प्रयत्न असून रशियाकडील शस्त्रसाठा संपत आल्याचे पाश्चिमात्य माध्यमे व विश्लेषकांनी म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात त्यानंतर दरवेळी होणाऱ्या मोठ्या हल्ल्यांमध्ये रशियाकडून किमान 40 ते 100हून अधिक क्षेपणास्त्रे तसेच ड्रोन्सचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे रशियाकडील क्षेपणास्त्रे व ड्रोन्सचा साठा संपत आल्याचे दावे फोल ठरले आहेत.

रशियाच्या हे क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले म्हणजे नव्या आक्रमणाचेच संकेत आहेत, असा दावा युक्रेनी अधिकाऱ्यांनी केला. 24 फेब्रुवारीला रशिया-युक्रेन संघर्षाला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन नव्याने आक्रमण करतील, असे दावे युक्रेन व पाश्चिमात्य यंत्रणांकडून करण्यात येत आहेत. नव्या आक्रमणासाठी रशियाने तब्बल 1,800 रणगाड व 400 लढाऊ विमाने सज्ज ठेवल्याचे सांगण्यात येते. युक्रेनी अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, नव्या आक्रमणासाठी पाच लाख जवान तैनात करण्यात येणार असून डोन्बास क्षेत्रासह खार्किव्ह प्रांत व दक्षिण युक्रेनचा भाग लक्ष्य करण्यात येणार आहेत.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info