अमेरिकेच्या शिकागोतील हिंसाचारात ६०हून अधिक जणांवर गोळीबार – १० जण मृत्युमुखी

अमेरिकेच्या शिकागोतील हिंसाचारात ६०हून अधिक जणांवर गोळीबार – १० जण मृत्युमुखी

शिकागो – अमेरिकेतील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या शिकागोमध्ये गेले तीन दिवस जबरदस्त हिंसाचार भडकला असून ६०हून अधिक जणांवर हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये १० जणांचा बळी गेला आहे. यामध्ये रविवारी सुमारे ३० जणांवर झालेल्या गोळीबाराचाही समावेश आहे. ही परिस्थिती ‘सिव्हिल वॉर’(गृहयुद्ध) सारखी असून या हिंसाचाराचे कारण स्पष्ट झालेले नाही. पण एका पोलीस अधिकार्‍याने हा टोळीयुद्ध अर्थात गँगवॉरचा भाग असल्याचा दावा केला आहे. मात्र ठार झालेले व जखमी कुठल्या टोळीशी निगडित आहेत, याची खात्रीलायक माहिती अद्याप समोर आलेली नाही.

शिकागो, गोळीबार, फ्रँक वॉलर, gang war, हिंसाचार, हल्ला, अमेरिका, world war 3, सिव्हील वॉर’अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रचारादरम्यान तसेच त्यानंतरच्या विविध भाषणांमध्ये शिकागोमधील हिंसाचाराचा सातत्याने उल्लेख केला होता. गेल्यावर्षी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी शिकागोतील हिंसाचार थांबविण्यासाठी केंद्रीय प्रशासनाकडून सहाय्य धाडण्याचे आश्‍वासनही दिले होते. या पार्श्‍वभूमीवर, गेल्या तीन दिवसात शिकागोत घडलेला हिंसाचार लक्ष वेधून घेणारा ठरतो.

शिकागोच्या पोलीसदलाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार ३ ऑगस्ट ते रविवार ५ ऑगस्ट या कालावधीत शहरात ६३ जणांवर हल्ल्याची नोंद झाली. बहुतांश जणांवर अज्ञात हल्लेखोरांनी बंदुकीने गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे. हल्ला झालेल्या ६३ जणांपैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे. शहराच्या दक्षिण तसेच पश्‍चिम भागात सर्वाधिक हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. यात ‘लॉनडेल’, ‘वेस्ट गारफिल्ड पार्क’, ‘वेस्ट हंबोल्ड पार्क’, ‘लिटिल विलेज’, ‘लोगन स्क्वेअर’ व ‘ग्रेशम’ या भागांचा समावेश आहे.

शुक्रवार ते रविवारदरम्यान झालेल्या हल्ल्यांपैकी शनिवार-रविवारमधील २४ तासांच्या अवधीत तब्बल ३४ जणांवर हल्ले झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या हल्ल्यांमुळे शिकागो पोलीस दल तसेच शहरातील रुग्णालयांवर प्रचंड ताण आल्याचे सांगण्यात येते. शिकागोचे वरिष्ठ पोलीस अधिकारी फ्रँक वॉलर यांनी या हिंसाचारामागे टोळीयुद्ध अर्थात गँगवॉर असू शकते, असा दावा केला. मात्र त्यात कोणत्या टोळ्या अथवा गट सामील आहेत, याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही.

शिकागोमधील रुग्णालयात काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी शहराची अवस्था ‘वॉर झोन’प्रमाणे झाल्याचा दावा केला. पोलीसदलातील अधिकार्‍यांनीही गेल्या तीन दिवसांमधील हिंसाचार हे सर्वाधिक हिंसाचाराचे दिवस ठरल्याची कबुली दिली. काही विश्‍लेषकांनी शिकागोतील हा वाढता हिंसाचार ‘सिव्हील वॉर’सारखी स्थिती असल्याचा दावा केला.

अमेरिकेतील आघाडीच्या दैनिकाने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात, शिकागोचा समावेश देशातील सर्वाधिक हत्या होणार्‍या शहरांच्या यादीत केला होता. शिकागोतील हिंसक गुन्ह्यांची प्रकरणे तब्बल २१ टक्क्यांनी वाढल्याचा इशारा या अहवालात देण्यात आला होता.

English  हिंदी

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info